#एमपीएससी विद्यार्थी आंदोलन: गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे- कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी नियोजित राज्य सेवा पूर्व (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि परीक्षा 14 मार्चलाच घ्यावी यासाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी नवीपेठेत शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर झोपून […]

Read More

संजय राठोड अजूनही मंत्रीपदावर कायम?

मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी या प्रकरणाशी नाव जोडले गेलेले राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने आंदोलने करीत सरकारवर दबाव आणला. तसेच जर राजीनामा घेतला नाही तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना तोंड उघडू देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Read More

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना मिळाले 5 कोटी रुपये: पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप

पुणे—पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर आता हे प्रकरण शांत होईल असे वाटत असतानाच हे प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई वडिलांना 5 कोटी रुपये मिळाले असल्याचा खळबळजनक आरोप पूजाच्या चुलत आजीने केल्याने पुन्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शांताबाई राठोड असे पूजाच्या चूलत आजीचे नाव आहे. […]

Read More

मला एक दिवस मुख्यमंत्री करा:‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे- ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुले हे त्यांच्या विविध वक्तव्यामुळे नेहेमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मला एक दिवस मुख्यमंत्री करा ,बघा मी संपूर्ण मंत्रीमंडळ व प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो असे पत्र लिहिले आहे. बिचकुले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे […]

Read More

तर सरकारला सभागृहात तोंड उघडू देणार नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण तापलेले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने भाजप आक्रमक झाला आहे. आता सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आहे. त्यामुळे सरकारची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची तयारी केली असल्याचे दिसते आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर […]

Read More

अन्यथा राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा: उद्यापासूनधार्मिक,राजकीय,सामाजिक,सरकारी कार्यक्रमांना बंदी

मुंबई- राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना मास्क घाला,शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे सांगत राज्यात कोरोनाची  दुसरी लाट धडका मारत असल्याने अनेक गोष्टींवर पुन्हा बंधने घालण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून धार्मिक,राजकीय,सामाजिक, सरकारी कार्यक्रमांना, गर्दी करणाऱ्या मोर्च्यांवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय […]

Read More