शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा

पुणे-शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांना मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल -चंद्रकांत पाटील

पुणे- मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा असल्याचे सांगत संभाजीराजे यांच्या भारतीय जनता पार्टी सदैव पाठीशी उभी राहील असे ते म्हणाले. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जे ओबीसींना ते […]

Read More

पंतप्रधान राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत : नरेंद्र मोदींच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे–पंतप्रधान म्हणून देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी देऊन रयतेचे कल्याण करण्यासाठी प्रेरित करा. खरा राजधर्म शिकण्याची संधी देण्यासाठी माफ करा असे गाऱ्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराज यांच्यापुढे मांडण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाराष्ट्राने देशात कोरोना […]

Read More

राजनाथ सिंह यांच्या त्या वक्तव्यामुळे माफी मागण्याची मागणी

पुणे : -छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत आणि त्याचा निषेध करत राजनाथ सिंह यांनी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही निषेध केला […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे ‘हिरो’- राज्यपाल कोश्यारी

पुणे-आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहे. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत हिंदूची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. देशात एक प्रकारची नवीन चेतना निर्माण केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे ‘हिरो’ आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यानी काढले. राज्यपाल भगत […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला – विष्णू कोकजे

पुणे – “लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला आहे, कारण अनेक देशांवर झालेल्या इस्लामिक आक्रमणामुळे ते देश मुस्लिम देश झाले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन माजी न्यायमूर्ती व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले. ज्येष्ठ शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या “छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर…” या […]

Read More