‘टास्क फोर्स’कडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय – उदय सामंत

पुणे- : कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाली तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, करोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हे असतील तर महाविद्यालये सुरू करणे धाडसाचे होईल. त्यामुळे ‘टास्क फोर्स’कडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी उदय सामंत […]

Read More

कोरोना काळातही महिलांमधील कुटुंब वत्सलता अधोरेखित

कोरोना काळातील एकत्र आणि विभक्त कुटुंबातील काही निरीक्षणे लक्षात घेता एकत्र  कुटुंबातील महिला बाधित होवूनही विभक्त कुटुंबातील बाधीत महिलांपेक्षा त्यांना ताण कमी आल्याचे स्पष्ट झाले आहे. एकत्र कुटुंबात सर्व जबाबदाऱ्यांचे स्वाभाविक विभाजन होत असल्यामुळे या कुटुंबातील महिलांना तीव्र ताण जाणवला नाही. एकत्र कुटुंब पद्धती आणि भारतीय नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये असलेली ‘कुटुंबवत्सलता’ कोरोना काळात अधोरेखित झाली […]

Read More

अखेर उद्या लागणार बारावीचा निकाल : कसा बघणार निकाल?

पुणे – अखेर उद्या (मंगळवार) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा ही परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. बारावीच्या निकाल प्रक्रियेला गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. पण राज्य मंडळाला […]

Read More

लाॅकडाऊनमधून शनिवार वगळा – खा. गिरीश बापट

पुणे- कोरोना बाधितांचा दर तीन टक्यांपेक्षा खाली आल्याने लॉकडाऊन विकएन्डमधून शनिवार वगळावा व व्यापा-यांना दुकानाच्या वेळा वाढवून द्याव्यात.अशी मागणी खा.गिरीश बापट यांनी रविवारी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली. दुकानांची वेळ सकाळी दहा ते रात्री आठ अशी करावी. अशी सूचनाही त्यांनी केली. तशा आशयाचे निवेदन बापट यांनी आयुक्तांना पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की कोरोना […]

Read More

वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन

पुणे –कोरोनाच्या दुस-या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर […]

Read More

निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट नाही

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट मिळणार नाही. महानगरपालिकेकडून आज (शनिवारी 31 जुलै) जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ चार पर्यंतच असणार आहे. पण येत्या काही दिवसांत पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

Read More