Sumba Artfest 2025 :सुंबरान आर्ट फाऊंडेशन तर्फे सुंबा आर्टफेस्ट 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 15 ते 22 डिसेंबर 2025 दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे सकाळी 11 ते रात्री 8 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. कला महोत्सव ज्येष्ठ चित्रकार कै. प्रा. रावसाहेब गुरव यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जात आहे.
भारतामध्ये ८०० पेक्षा अधिक आदिवासी जमाती आहेत आणि १०० पेक्षा जास्त कलाप्रकार आहेत, त्यापैकी बरेच आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सुंबा आर्टफेस्ट २०२५ या परंपरांवर प्रकाश टाकत आहे. आदिवासी कलाकारांना थेट व्यासपीठ देऊन त्यांना आपली कला दाखवण्याची, विक्री करण्याची आणि कलामागील कथा सांगण्याची संधी येथे मिळेल. प्रत्यक्ष विक्रीतील प्रत्येक रक्कम थेट कलाकारांपर्यंत पोहोचेल. येथे कोणताही मध्यस्ती नाही.या उत्सवात सुंबा बाजार,सुंबा सभा, सुंबा सन्मान अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. ज्येष्ठ चित्रकार कै. प्रा. रावसाहेब गुरव यांच्या लोकप्रिय चित्रांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.
उत्सवातील प्रमुख घटक
सुंबा बाजार
सादरीकरणं, आदिवासी कला, थेट कलानिर्मिती आणि कलाकारांशी संवाद. पाहुणे प्रत्यक्ष कलाकृती तयार होताना पाहू शकतात आणि विक्री थेट कलाकारांकडून करू शकतात.
सुंबा सभा
चर्चा, अनुभवकथन आणि कलाप्रवास. भारताच्या कलापरंपरांबद्दल सखोल समज वाढवण्याचा हा मंच आहे.
सुंबा सन्मान
कलाक्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दिगजांचा सत्कार सोबतच कलानिधी पुरस्कार पुन्हा सुरू करण्यात येत आहे, ज्यामध्ये भारताच्या सर्जनशील परंपरेला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव केला जाईल
भारताच्या सुमारे सात-आठ राज्यांतील दहा कला आपल्या व्यासपीठावर येत आहेत. त्यापैकी दोन-तीन कला या लुप्त होत आहेत त्यांना व्यासपीठ मिळाले तसेच तीन- चार कला तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच सादर होत आहेत. या सर्व कलांच्या कलाकारांना आपल्या पर्यंत आणण्यासाठी आणि त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी श्रीकृष्ण परांजपे सरांनी सुंबरान ट्रस्ट सोबत समन्वय करून आम्हास साथ दिली. सुंबा आर्ट फेस्ट २०२५ चे इव्हेंट मॅनेजमेंट व डिझाइन चे काम आयडियामेंट कंपनीने केले आहे.
विशेष आकर्षणं
पद्मश्री अच्युत पालव आणि पद्मश्री वासुदेव कामत यांची विशेष सादरीकरणं व सन्मान
कलाकार, विद्यार्थी, आदिवासी समाज आणि कला रसिकांसाठी आठ दिवसांचा समृद्ध अनुभव
सांस्कृतिक वचन
सुंबा आर्टफेस्ट २०२५ हा केवळ उत्सव नाही. तो परंपरेचा सन्मान करणारी आणि कलाकारांना उभारी देणारी सांस्कृतिक जागा आहे. शास्त्रीय ते आधुनिक, नागरी ते आदिवासी प्रत्येक कलाप्रकाराला समान सन्मान देणारा हा मंच आहे.
सुंबा म्हणजे वचन
हरवत चाललेल्या परंपरांना जपण्याचे, गरजू कलाकारांना साथ देण्याचे आणि भारतातील कला जिवंत ठेवण्याचे.
शिक्षक, मार्गदर्शक आणि सर्जक म्हणून कै. प्रा. रावसाहेब गुरव यांनी सहा दशके कार्य केले. त्यांच्या कार्याने अनेक पिढ्यांच्या कलाकारांना प्रेरणा दिली. शिरोळ, कोल्हापूर येथील बालपणावर आधारित ‘धनगर’ ही त्यांची चित्रमाला समुदायजीवन आणि निसर्ग यांचे जिवंत प्रतिबिंब आहे. आज त्यांची कन्या, उद्योजिका चित्रा मेटे सोबतच श्री. विनय फडणीस सर यांचे मार्गदर्शन, साहाय्य, ही परंपरा पुढे नेत आहेत. ‘लहानपणापासून कलाकारांविषयीची करुणा आणि परंपरा जपण्याची श्रद्धा त्यांनी आत्मसात केली. सुंबा म्हणजे त्यांच्यासाठी एक वचन कलावंतांनी कलावंतांसाठी निर्माण केलेले मुक्त व्यासपीठ आहे. भारतातील कोणत्याही कला परांपरांचा ऱ्हास होऊ नये, कलेची प्रत्येक श्वासगाथा जपण्याची, कलाकाराच्या प्रत्येक स्वप्नाला मंच देण्याची, आणि आपल्या मातीतील प्रत्येक कलेला जगासमोर उजाळा देण्याचे कार्य केले.












