पिंपरी(प्रतिनिधी): सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आकुर्डी येथील थरमॅक्स चौकातील स्टेप्स अकॅडमीने यंदा विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी, 12 वी सोबतच सीईटी, जेईई, नीट, तसेच सीए, सीएमए, सीएस आदी परीक्षांची तयारीही करता येईल, अशी अभ्यासरचना आखली आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीयल व्हिजिट, सहलचे आयोजन , तसेच मॅरेथॉन बॅच, दे धक्का बॅच असे अनोखे प्रयोग राबवित विद्यार्थीहित जपण्याचे कार्य स्टेप्स अकॅडमी करीत आली आहे, अशी माहिती स्टेप्स अकॅडमीचे संस्थापक प्रा. संदेश मुखेडकर यांनी दिली.
नीट, तसेच सीए, सीएमए, सीएस दहावी, बारावीनंतर विद्यार्थी करिअरच्या बाबतीत गोंधळलेल्या परिस्थितीत असतात. त्यामुळे त्यांना या टप्प्यावर करिअर विषयक मार्गदर्शन मिळणे नितांत गरजेचे असते. हे लक्षात घेऊन अकॅडमी दरवर्षी मोफत करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करीत असते. यामध्ये कॉमर्स, सायन्स शाखेतील संधींविषयी मार्गदर्शन केले जाते. याचा हजारो विद्यार्थी, पालक लाभ घेऊन विचारपूर्वक करिअर निवडतात. याविषयी बोलताना प्रा. संदेश मुखेडकर यांनी सांगितले, की कॉमर्स की सायन्स अशा द्विधा मन:स्थितीत विद्यार्थी असतात. बारकाईने निरीक्षण केल्यास लक्षात येते की आगामी काळात कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढणार आहे. गेल्या पाच वर्षात कॉमर्स शाखेकडे विद्यार्थीसंख्या खूपच कमी झाली होती. यावर्षी मात्र कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याची परिस्थिती आहे, असेही प्रा. मुखेडकर यांनी सांगितले.
याबरोबरच एमबीए एन्ट्रान्स प्रिपरेशन बॅच घेतली जाते, ज्याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा मिळतो. क्लासेसला ऍडमिशन घेण्यासाठी 8वी+9वी+10 वी किंवा 9वी+10वी, 11वी+12वी अशा कोंबो (Combo) पॅकेज निवडण्याची संधीही इथे मिळते.
ध्येय गाठण्यासाठी नियमित प्रोत्साहन, विषयानुसार अनुभवी शिक्षक, प्रत्येक बॅचमध्ये मर्यादित विद्यार्थी, दर आठवड्याला प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याची तयारी केली जाते. कन्सेप्टनुसार मार्गदर्शन करून प्रत्येक विद्यार्थ्यांला परफॉर्मन्स अहवाल प्रदान केला जातो.
स्टेप्स अकॅडमीने नेहमीच सामाजिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना महामारीने ज्या विद्यार्थ्यांचे पालक मृत्यूमुखी पावले, अशा सुमारे 40 विद्यार्थ्यांना अकॅडमीने मोफत क्लासेसची सुविधा प्रदान केली आहे.