श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२३ मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने सलग दुस-या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, भवानी  पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने चौथे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ मंडळांपैकी १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ रायकर, कार्याध्यक्ष यतीश रासने, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर आणि पदाधिकारी  उपस्थित होते.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दिनांक १० आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. पारितोषिक वितरण केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या आग्राहून सुटका या देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, शिवाजी मित्र मंडळाच्या नवशेराका शेर ब्रिगेडिअर मोहम्मद उस्मान इनके या या सजीव नाटयास ४५ हजारांचे, श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या अपारंपारिक उर्जा निर्मिती या देखाव्यास ४० हजारांचे, संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या भांड्यांपासून गणेश मूर्ती या देखाव्याला ३५ हजारांचे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाला ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले. स्पर्धेच्या परीक्षण मंडळात डॉ.अ.ल.देशमुख, विजय चव्हाण, मधुकर जिनगरे, सुरेश वरगंटीवार, सतिश मराठे, किशोर सरपोतदार, चंद्रकांत निनाळे, बापू पोतदार, अविनाश कुलकर्णी, दिगंबर गायकवाड, संदीप शिंदे, विनायक भगत यांसह सहाय्यक म्हणून बाळू घाटे, अनिरुद्ध दोरगे, निखील कांबळे, गौरव दरेकर यांनी काम पाहिले.

अधिक वाचा  '#टाटा मोटर्स’च्या वतीने पुणे येथे RED #DARK श्रेणीसह बीएस6 फेज II सादर  

इतर निकाल :-

१) पश्चिम विभाग  :- श्रीमंत आझाद मित्र मंडळ डेक्कन जिमखाना (प्रथम), आराधना स्पोर्टस क्लब जनवाडी (द्वितीय), अजिंक्य मित्र मंडळ मॉडेल कॉलनी (तृतीय), काल्पनिक देखावे – भैरवनाथ तरुण मंडळ औंध गाव, जल्लोष सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ. सजीव देखावे – अभिनव मित्र मंडळ ट्रस्ट शिवाजीनगर (प्रथम), श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ एरंडवणे (द्वितीय), समस्त गावकरी मंडळ कोथरुड (तृतीय), संयुक्त आझादनगर मंडळ, अखिल जनवाडी सार्व. गणेशोत्सव मंडळ (उत्तेजनार्थ – विभागून). धार्मिक व पौराणिक देखावे – संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ कोथरुड (प्रथम), नवजवान मित्र मंडळ कोथरुड (द्वितीय). सामाजिक कार्य – श्रीकृष्ण मंडळ ट्रस्ट डेक्कन जिमखाना (प्रथम), नानाजी तरुण मंडळ कोथरुड (द्वितीय), एरंडवणे सार्व. गणेशोत्सव मंडळ कर्वे रोड (तृतीय). ऐतिहासिक देखावा – विनायक नवयुग मित्र मंडळ भांडारकर रोड (प्रथम), अखिल भेलकेनगर मित्र मंडळ कोथरुड (द्वितीय). वैज्ञानिक देखावा – आनंदनगर पार्क मित्र मंडळ पौड रोड (प्रथम), नवभारत मित्र मंडळ भेलकेनगर (द्वितीय), विनायक मित्र मंडळ कर्वे पुतळा (तृतीय).

 

२) पूर्व विभाग :- अखिल गणेशबाग मित्र मंडळ मुंढवा रोड (प्रथम), जय जवान मित्र मंडळ एमजी रोड कॅम्प (द्वितीय), नवरंग मित्र मंडळ हडपसर (तृतीय). सामाजिक  – जय भवानी मित्र मंडळ काळेपडळ.

३) उत्तर विभाग :-अष्टविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी (प्रथम), सुवर्णयुग मित्र मंडळ लोहगाव (द्वितीय), दि नॅशनल यंग क्लब खडकी (तृतीय), सामाजिक देखावे – जनतानगर मित्र मंडळ येरवडा (प्रथम), श्री अष्टविनायक मित्र मंडळ येरवडा (द्वितीय), आदर्श तरुण मित्र मंडळ येरवडा (तृतीय), धार्मिक देखावे – अष्टविनायक मित्र मंडळ येरवडा (प्रथम), अखिल रामनगर मित्र मंडळ येरवडा (द्वितीय), वैज्ञानिक देखावे – विकास तरुण मंडळ खडकी बाजार.

अधिक वाचा  अनिश्चिततेच्या रोलर कोस्टर राईडमधून अम्युझमेंट पार्क इंडस्ट्रीला वाचवा :द इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अॅण्ड इंडस्ट्रीजची पंतप्रधानांकडे मागणी

४) दक्षिण विभाग :- एकता मित्र मंडळ अरण्येश्वर (प्रथम), शिवशक्ती कबड्डी संघ दत्तवाडी (द्वितीय), वनराई कॉलनी मित्र मंडळ धनकवडी (तृतीय). सामाजिक देखावे – डॉ.मिनू मेहता औद्योगिक संस्था येवलेवाडी, जय महाराष्ट्र मित्र मंडळ तानाजीनगर धनकवडी, अखिल नरवीर तानाजी मित्र मंडळ धनकवडी. धार्मिक देखावे – उंब-या गणपती मित्र मंडळ धायरी (प्रथम), वीर तानाजी तरुण मित्र मंडळ माणिकबाग (द्वितीय), साई मित्र मंडळ आंबेगाव पठार (तृतीय), सजीव देखावे – युगंधर मित्र मंडळ आनंदनगर, ऐतिहासिक देखावे – उदय मित्र मंडळ दत्तवाडी.

५) मध्य (उत्तर) विभाग :- नारायण पेठ माती गणपती ट्रस्ट (प्रथम), शनिवार मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (द्वितीय), श्री गजानन मित्र मंडळ लक्ष्मी रोड (तृतीय). सजीव देखावे – गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ सोमवार पेठ (प्रथम), अपोलो तरुण मंडळ सोमवार पेठ (द्वितीय), विधायक मित्र मंडळ कसबा पेठ (तृतीय). ऐतिहासिक देखावे – फणी आळी तालीम ट्रस्ट कसबा पेठ (प्रथम), प्रकाश मित्र मंडळ कसबा पेठ (द्वितीय), आॅस्कर मित्र मंडळ कसबा पेठ (तृतीय). वैज्ञानिक देखावे – सत्यज्योत मंडळ ट्रस्ट सोमवार पेठ, धार्मिक देखावे – मराठा मित्र मंडळ रास्ता पेठ (प्रथम), श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान कसबा पेठ (द्वितीय).

६) मध्य (दक्षिण) विभाग :- पोटसुळ्या मारुती मंडळ नाना पेठ (प्रथम), महाराष्ट्र तरुण मंडळ बुधवार पेठ (द्वितीय), जय बजरंग मंडळ बुधवार पेठ (तृतीय).  ऐतिहासिक देखावे – वीर शिवराज मंडळ गुरुवार पेठ (प्रथम), पद्मशाली सम्राट मंडळ ट्रस्ट भवानी पेठ (द्वितीय). धार्मिक देखावे – विकास तरुण मंडळ भवानी पेठ (प्रथम), होनाजी मित्र मंडळ बुधवार पेठ (द्वितीय), अखिल कापड गंज सार्व. गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ (तृतीय). सजीव देखावे – जय जवान मित्र मंडळ नाना पेठ (प्रथम), सुंदर गणपती तरुण गणेश मंडळ रविवार पेठ (द्वितीय), शिवतेज मित्र मंडळ शुक्रवार पेठ, आदर्श सेवा मंडळ रविवार पेठ (विभागून – तृतीय). काल्पनिक देखावे – आदर्श बाल मंडळ ट्रस्ट भवानी पेठ. वैज्ञानिक देखावे – अखिल समझोता मित्र मंडळ नाना पेठ (प्रथम), नवभारत सेवक मंडळ भवानी पेठ (द्वितीय)

अधिक वाचा  बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेचा पुण्यात अपघात

७) जय गणेश भूषण पुरस्कार प्राप्त मंडळे सन्मान :- अरण्येश्वर मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, हिंद तरुण मंडळ ट्रस्ट, आदर्श मित्र मंडळ, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर ट्रस्ट.

८) महोत्सवी वर्ष असलेली गणेश मंडळे :- त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्ट, श्री सदाशिव पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (१०० वर्ष), टिळक तरुण मंडळ नवी पेठ, दर्शक तरुण मंडळ येरवडा (५० वर्षे).

९) शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य करणारी मंडळे :- नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट येरवडा, अखिल मोहननगर मित्र मंडळ धनकवडी.

 

१०) शालेय विभाग (पुणे शहर परिसर) :- न्यू इंग्लिश कूल रमणबाग (प्रथम), नवीन मराठी शाळा (द्वितीय), श्रीम. एम.एच.पटेल इंग्लिश मीडियम स्कूल सोमवार पेठ (तृतीय), बालशिक्षण मंदिर भांडारकर रस्ता, नूतन बालविकास मंदिर सदाशिव पेठ (उत्तेजनार्थ).

११) बाल मित्र मंडळ :- श्रीराम बाल मित्र मंडळ सोमवार पेठ.

१२) सोसायटी :- सदाशिव गृह.र.संस्था मर्या.कोथरुड (प्रथम), सरिता विहार गृह.र.संस्था मर्या. सिंहगड रस्ता (द्वितीय), जय शंकर सोसायटी श्री गणेश मित्र मंडळ, घोले रस्ता (तृतीय), वर्धमान रेसिडन्सी को आॅप हौ.सोसा, राम सहकारी गृह. र.संस्था मर्या. येरवडा (उत्तेजनार्थ)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love