पुणे- 35 व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत १० विविध भाषांमध्ये २००० हून अधिक गाणी गाणारे आणि तरुणांचे ‘आयडॉल’ बनलेले ज्येष्ठ पार्श्वगायक सोनू निगम यांच्या ‘म्युझिकल नाईट’ने पुणेकरांची रविवारची संध्याकाळ संगीतमय केली. सोनू निगम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या विविध हिंदी गाण्यांनी श्री गणेश क्रीडा रंगमंच दणाणून गेला. (Sonu Nigam’s Jalwa at Pune Festival)
सोनू निगम नाईट हे यंदाचे पुणे फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण होते. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी ‘सोनू निगम म्युझिकल नाईट’ मध्ये जुन्या व नव्या हिट गाण्यांची मेजवानीच रसिक प्रेक्षकांना मिळाली.
सोनू निगम यांच्या सुरेल आवाजाची जादूने प्रेक्षकांना अक्षरशः वेडे केले. सोनू निगम यांच्या गाण्यांवर तरुणाईची पावले थिरकली. तर प्रेक्षकांनी शिट्या आणि टाळ्यांनी संपूर्ण सभागृह डोक्यावर घेतले. सोनू निगम यांनी रोमँटिक, वेगवान संगीत, आणि हिप-हॉप गाणी देखील गायली. प्रेक्षकांनी त्यांच्या सुरात सुर मिसळले आणि संपूर्ण वातावरण संगीतमय झालं.
माझे पुण्यावर विशेष प्रेम आहे असे म्हणत आपल्या गाण्याला सुरुवात केली.
पम…परारारा…पम’ या गाण्याने त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर ऐसा पहली बार हुआ 17- 18 सालों में…दीवाना…कोई आ जाए, मेरे ख्यालों में, मैं हूं दीवाना तेरा…दीवाना, हंस मत पगली…प्यार हो जाएगा, फिल्म, लाल सिंह चड्ढा या चित्रपटातील, देख कर भी दिल नहीं भरा…मैं की करा, देखा तुमको जबसे…बस
तुमको यारा… कहे दो ना… कहे दो ना..यु आर माय सोनिया…, शुक्रान अल्लाह, गुमसुम…गुमसुम रहने वाली, तू दे दे मेरा साथ…थाम ले हाथ…चाहे जो भी हो, प्यार मांगा है तुम्ही से… इंकार ना करो.. चलते चलते मेरे ये गीत याद रखना..कभी अलविदा ना कहना.., अब मुझे रात दिन तुम्हारा ही ख्याल है…, सूरज हुआ मद्धम.. चांद जलने लगा.., दिल डुबा.. दिल डुबा.. निली आखोमे ये दिल डुबा.., ये दिल दीवाना.. दीवाना है ये दिल…दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना..,मेरे हाथ में, तेरा हाथ हो…सारी जन्नतें मेरे साथ हो.., आजा.. आजा.. मै हू प्यार तेरा…, हम राही है प्यार के…मेरे सपनो की रानी… कब आयेगी तू… ओ मेरे दिल के चैन…अशा वेगवान संगीताच्या तालावर उडत्या चालीवरच्या गाण्यांमध्ये प्रेक्षकांचा सहभागा सभागृह दणाणून गेले.
प्रेक्षकांनी मराठी गाण्यांची फर्माईश केल्यानंतर सोनू निगम यांनी हिरवा निसर्ग हा भवतीने …जीवन सफर करा मस्तीने.. हे गाणे सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची आज विशेष उपस्थिती होती. त्यांनी या मैफिलीचा आस्वाद घेतला. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अभय छाजेड, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक कोहिनूर ग्रुपचे राजेश गोयल आणि किंजल यावेळी उपस्थितीत होते.
सुरेश कलमाडी यांनी सोनू निगम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मीरा कलमाडी यांच्या हस्ते सर्व वादक आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुरिया शिपचांडलर यांनी केले.