पुणे- भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सने ट्रॅक्टर उद्योगातील पॉवरहाऊस म्हणून आपली क्षमता पुन्हा सिद्ध करत आर्थिक वर्ष २०२५ मध्ये नवीन कामगिरीचे शिखर गाठले आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होत असतानाच कंपनीने ६३,१३६ ट्रॅक्टरची विक्री करून वार्षिक आधारावर आतापर्यंतची देशांतर्गत सर्वाधिक विक्रीची नोंद केली आहे. तसेच देशांतर्गत उद्योगात बाजारपेठेतील आघाडीचा हिस्सा कायम ठेवला आहे. यात उद्योगाच्या कामगिरीच्या तुलनेत सात पट वाढीच्या आश्चर्यकारक कामगिरीचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना मुबलक पीक मिळेल यासाठी त्वरेने आणि वैयक्तिक ट्रॅक्टर वितरीत करण्याची सोनालिकाची हातोटी आहे. त्यामुळे १७ लाखांहून शेतकरी कुटुंबांच्या ती घराघरात पोहोचली आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती पद्धतींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर केंद्र सरकार अलीकडे भर देत आहे. कृषी यांत्रिकीकरण वाढवण्याची ब्रँडची कटिबद्धता ही त्याच्याशीही सुसंगत आहे. शेतकऱ्यांना किफायती खर्चात सर्व हंगामात यश मिळावे, यासाठी नवीन युगातील शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करता यावा यासाठी सोनालिकाने याआधीच वार्षिक ‘सोनालिका हेवी ड्युटी धमाका’ ऑफर सादर केली आहे.
या कामगिरीबद्दल बोलताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, “प्रत्येक शेतकऱ्याची मागणी ही अनोखी असते. त्यामुळेच वैयक्तिक शेती पद्धती विकसित करण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन अत्यावश्यक असतो. तो आमच्या डीएनएमध्ये आधीच आहे. ट्रॅक्टर उद्योगासाठी आमच्या अनोख्या योगदानामुळे आम्हाला आतापर्यंतची वार्षिक सर्वाधिक ६३,१३६ ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री नोंदवता आली आहे. तसेच सातत्याने भारतातील बाजारपेठेचा वाटा काबिज करता आला आहे. यामध्ये उद्योगाच्या कामगिरीच्या तुलनेत तब्बल सात पट वाढीचा समावेश आहे. ट्रॅक्टरमध्ये ऑप्टिमाइझ केलेल्या शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हे शेतकरी समुदायामध्ये झपाट्याने केंद्रस्थानी येत आहे, यावर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
‘मेक-इन-इंडिया’ उपक्रमाच्या यशस्वी दशकपूर्तीमुळे भारतातील दर्जेदार उत्पादनावर जगाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड या नात्याने ट्रॅक्टर क्षेत्रात भारताच्या विकासाची गाथा पुढे नेण्याचा एक स्वदेशी ब्रँड म्हणून आम्हाला अभिमाव आहे. शेतकऱ्यांना सर्वोत्तम हेवी ड्युटी ट्रॅक्टर मिळत राहावेत, याची खात्री करण्यासाठी आम्हाला आनंदच होईल. तसेच नाविन्यपूर्णतेचा आमचा प्रवास आम्ही पुढेही सुरू ठेवू.”