पुराणातील सावित्री आणि ज्योतीबाची सावित्री


नवऱ्याने वटपौर्णिमेच्या आदल्या रात्री विचारलं

काय मग तयारी उद्याच्या वटपौर्णिमेची..

बिछाना झटकताना तिने त्याच्या कडे पाहिलं..

त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तरली ती,

काहीच नाही..

उद्या रविवार आहे.. मी उशिरा उठणार आहे..

छान नाश्ता बनवायला सांगितलंय बाई ला.

मला उठवू नकोस.. हा वीक खुप हेक्टिक गेलाय माझा.

दुपारच्या जेवणाचं बाईला सांगून देईन आत्ता वॉट्सअप वर. काय खायचय ते सांग.. आणि हो मुलांच्या शाळा सुरु होताहेत पुढच्या आठवड्यात त्याची तयारी करू उद्या सायंकाळी.. बाहेरच जेऊन येऊ रात्री..

मोबाईल हातात घेऊन उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे बघत ती उभी.

तो स्तब्ध..

काय बोलू हेच कळेनासा..

अरे सांग ना.. उद्या काय बनवायला सांगू लंच ला.

सांग काहीही.. तो

तिला जाणवलं तो नाराज झाल्याचं..

तिने फोन बाजूला ठेवला..

त्याचा हात घेतला हातात आणि गॅलरीतल्या झोपाळ्यावर बसली..

हलका हलका झोका घेताना अलगद तिची मान त्याच्या खांद्यावर विसावली.

अधिक वाचा  शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरेंइतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही: पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही- शरद पवार

जवळच कुठेतरी  पाऊस पडला असावा.. छान सुगंध वातावरणात पसरला होता.

आता जमत नाहीत रे उपवास करायला.. चाळीशी उलटली माझी. शुगर bp थायरॉईड सगळं वस्तीला आलंय शरीरात..

पाळीच चक्र अस्ताव्यस्त झालंय.. आजकाल खुप थकवा येतो लवकरच… ऑफिस मध्ये प्रमोशन बरोबर जबाबदारी ही वाढलीये.

त्याने थांबवलं तिला..

अग तू का guilty वाटून घेतेस.. मला सगळं माहितीये गं.. दिसत नाही का मला कशी सकाळ पासुन कामाला भिडलेली असतेस ते..

त्याच बोलणं मध्येच थांबवत ती म्हणाली तुही मदत करतोस कि प्रत्येक कामात.

हो गं.. पण एक मिनिट मी मदत करत नाही तुला.. हे घर तुझं एकटीच नाही सगळी कामं तूच करायला. हा आपल्या दोघांचा संसार आहे. Its our equal responsibility to take care of our home n family. त्यामुळे राणी सरकार मदत नाही.. eqully कामं करणं हा माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच..

डोळ्यात पाणी येता येता हसूच आलं तिला..

अधिक वाचा  वास्तववादी परराष्ट्र धोरणाचा पाया रचणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तिचे डोळे पुसत तो म्हणाला

राणी माझ्यासाठी उपवास करून तुझी तब्येत खराब झालेली मला चालेल असं तुला वाटलंच कसं?   माझं आयुष्य वाढवण्यासाठी रोज सकाळी लवकर उठवून माझ्यासोबत तुही  walk ला येतेस..

माझं डाएट काटेकोर संभाळतेस.. माझ्या डॉक्टर्स च्या रेग्युलर visit tests चा follow up संभाळतेस..

योग्य सल्ले देतेस.

हे आधुनिक वटसावित्रीचं व्रत तर तू वर्षभर करतेस..

प्रेम दाखविण्यासाठी जसा एक valentine day पुरेसा नाही नं तसंच नवऱ्याचं  उदंड आयुष्य मागण्यासाठी एका दिवसाच वटसावित्रीच व्रत कसं पुरेसं पडेल.. हे व्रत तुझ्यासारख्या सावित्रीच्या लेकी रोज करतात. फक्त नवऱ्यासाठी नाही तर सासूसासरे, आई वडील, भावंडे, मुलं, नातेवाईक.. the list is unending..

तुम्ही आजकालच्या बायको मंडळी आहात नं त्यांनी परफेक्टली balance केलीये पुराणातील सावित्री आणि ज्योतिबांची सावित्री.

So my new generation सावित्री… hey अग

बोलण्याच्या नादात तिच्या डोळयांतून ओघळणारे अश्रू त्याच्या लक्षातच आले नव्हते..

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर

खांद्यावर हात टाकून त्याने तिला अजून जवळ घेतलं.

तिचे डोळे पुसून तिच्या कपाळावर त्याने ओठ टेकवले.

थोडा वेळ शांततेत गेल्यावर तो पुन्हा बोलू लागला..

मी तुला उद्या आम्ही सोसायटीतल्या पुरुषांनी ठरवलेली एक गोष्टी सांगणार होतो..

आम्ही सर्वांनी ठरवलंय कि सोसायटी च्या बाहेर रस्त्याच्या कडेला वडाची झाडं लावायची आपआपल्या बायकांच्या हातून.. चांगली कल्पना आहे ना..

अग अजून एक… ऐक ना..

तीही डोळे पुसून त्याचं बोलणं ऐकू लागली..

आणि मी काय म्हणतो इतकी वर्ष घासून पुसून आपल्या लायक झालेल्या नवऱ्याला पुढच्या जन्मी नेक्स्ट लेव्हल ला घेऊन जायला थोडं easy होत असेल नाही जन्मोजन्मी हाच नवरा मिळो या condition मुळे

काय गं…

हसता हसता लाडिक बुक्के मारीत ती त्याच्या मिठीत विसावली..

निशब्द वातावरण चंद्राच्या स्वप्नील प्रकाशात जादूमयी झालं होतं..                

सौ. वर्षा संदीप भरणे. नागपूर

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love