माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन


पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे व्रुध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, 3 मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते.शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख होती.

बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी जनसेवा केली. जनता पक्ष व समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते. प्रदेश जनता दलाचे ते अध्यक्ष होते. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते.

अधिक वाचा  पुणे मनपातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली अंशदायी सहाय्य योजना प्रशासनाने मोडीत काढू नये - गोपाळदादा तिवारी

पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. जनता पक्षाची प्रदीर्घ काळ धुरा सांभाळणारे आणि राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना घडवणारे म्हणून संभाजीरावांची ओळख होती.

1971 मधील विधान परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा संभाजीराव काकडे आमदार झाले. ते परिषदेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रंगराव पाटील यांचा पराभव केला होता.

संभाजीराव काकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 1978 मध्ये भारतीय लोक दलातर्फे, तर 1982 मध्ये जनता दलातर्फे ते बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले होते. जनता पक्ष आणि समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते.

सुरुवातीला सिंडीकेट काँग्रेस, नंतर जनता पक्ष तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते. माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. संभाजीराव काकडे यांनी राज्यस्तरावर आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवत अनेक कार्यकर्ते, नेते घडवले.

अधिक वाचा  संस्कृती प्रतिष्ठान आणि मिती इंफोटेनमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुर्गोत्सवा’ची घोषणा : नागरिकांना सहभाग घेण्याचे महापौरांचे आवाहन

लोकनेते शंकरराव मोहिते पाटील, बाळासाहेब देसाई, चिमणराव कदम, प्रेमला काकी चव्हाण आदी घराण्यात त्यांचे नातेसंबंध होते. कोणे एके काळी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या काकडे कुटुंबातील लाला काळाच्या पडद्याआड गेल्याने समर्थकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love