पुणे : वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती बरेचदा अनपेक्षितपणे उद्भवत असते,अशा स्थितीमध्ये आपले आर्थिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक ने बजाज फिनसर्व्ह हेल्थच्या हेल्थ-टेक विभाग असलेल्या बजाज फिनसर्व्हच्या सहकार्याने रूग्णांना सहजरित्या दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी बजाज फिनसर्व्ह हेल्थ ईएमआय कार्ड ही सुविधा सादर करण्यात आली आहे. या सेवेमुळे समान मासिक हफ्ता (ईएमआय) सुविधेसह अनेक नोंदणी लाभांसह त्वरित आर्थिक साहाय्य प्राप्त करणे सोपे होणार आहे.
पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक तर्फे रूग्णांना स्त्रीरोग,अस्थिरोग,युरोलॉजी,हृदयरोग,सौंदर्य प्रसाधने,बालरोग,आरोग्य तपासणी आणि रेेडिओलॉजी सारख्या 800 हून अधिक प्रक्रियांकरिता ईएमआय सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कागदपत्रांसाठी लागणार्या दीर्घकाळाची चिंता न करता काही मिनिटांतच सहजरित्या अर्थसाहाय्य उपलब्ध होईल.
याशिवाय बजाज फिनसर्व्ह हेल्थ आणि रूबी हॉल क्लिनिक तर्फे एक अद्वितीय सब्सक्रिप्शन मॉडेल असलेले रूबी हॉल मेडिकार्ड सादर करण्यात आले आहे. या कार्डच्या सदस्यांना अनेक सवलती व इतर वैद्यकीय सेवांसंदर्भात लाभ मिळतील. मेडिकार्ड या सेवेमागील संकल्पना अगदी सोपी आहे ती म्हणजे प्रतिबंधक आरोग्यसेवेचा प्रचार व प्रसार करताना ओपीडी आणि आयपीडी मध्ये प्रवेश घेणार्या रुग्णांवरील ताण कमी करणे.रूबी हॉल क्लिनिकबरोबर आमच्या या सहयोगामुळे रूग्णांना परवडत नाही म्हणून कुठलीही दिरंगाई न करता त्वरित उपचार सुरू करता येतील,असे बजाज फिनसर्व्ह हेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग मोदी म्हणाले.
यावेळी बोलताना रुबी हॉल क्लिनिकच्या मुख्य कामकाज अधिकारी डॉ.मनिषा करमरकर म्हणाल्या की, भारतात आरोग्य विमा आजही अतिशय अपुर्या प्रमाणात वापरला जातो. परिणामी जेव्हा एखाद्या कुटुंबाला आरोग्यसेवेची गरज भासते किंवा तातडीची परिस्थिती उद्भभवते तेव्हा आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे हा प्रश्न कुटुंबियांसमोर असतो. आमच्या या सहयोगाच्या माध्यमातून आमच्याकडे येणार्या प्रत्येकाला सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे अभियान आम्ही सुरू ठेवत आहोत. रुबी हॉल क्लिनिक मध्ये आमचा ठाम विश्वास आहे की, दर्जेदार आरोग्यसेवा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.
रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले की, केवळ पायाभूत सुविधांची उभारणी करणे म्हणजे वैद्यकीय सेवा नसून प्रत्येक गरजू रुग्णाला या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. सध्याच्या काळात कुटुंबातील व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर येणारा भावनिक व मानसिक ताण लक्षात घेता आमच्या या उपक्रमामध्य मोठा फरक पडू शकेल. सध्या असंख्य रुग्णांना केमोथेरपी, रेडिएशन, डायलिसिस किंवा ब्लड ट्रांसफ्युजन्स या कारणांनी नियमित सातत्याने वैद्यकीय सेवेची गरज असते. आमच्या मेडिकार्ड या सुविधेमुळे अशा रुग्णांना भविष्यात रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यानंतर त्यांना सुलभतेने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल.