रिया चक्रवर्तीला एनसीबीने केली अटक; काय म्हणाले रियाचे वकील?


मुंबई- अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेल्या रिया चक्रवर्ती हिला आज अखेर  नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी)  मोठी कारवाई करत अटक केली.  रिया चक्रवर्तीपूर्वीच भाऊ शौविक चक्रवर्ती यालाही यापूर्वी अटक करण्यात आली आहे. सुशांतसिंह याच्या फ्लॅटमध्ये १४ जून रोजी त्याचा मृतदेह लटकलेला आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. परंतु, सुशांतसिंहने आत्महत्या नव्हे तर त्याचा खून झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून आणि सहकार्यांकडून केला जात होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर या प्रकरणाला अनेक वळणे लागली आहेत. तपासातून या प्रकरणाला ‘ड्रग्ज’ अँगल मिळाला आणि अनेक धक्कादायक गोष्टी  

 रिया चक्रवर्ती यांच्याशी एनसीबी चौकशीचा आज तिसरा दिवस होता. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. सायंकाळी साडे चार वाजता तिची रवानगी आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी करण्यासाठी करण्यात आली. परवा तब्बल सहा तर काल आठ तास चौकशी केल्यानंतर आज सकाळी नऊ वाजल्यापासून तिची चौकशी सुरु होती. शेवटी तिला आज अटक करण्यात आली.

अधिक वाचा  अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींची निर्दोष मुक्तता

दरम्यान, रिया चक्रवर्तीचे वकील सतीश माने शिंदे यांनी तीन तपास एजन्सी एका मुलीला त्रास देत आहेत, असा आरोप केला. रिया एका ड्रग्ज व्यसनाधीन असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्याची शिक्षा रियाला मिळत आहे, रियाने एका मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीबरोबर प्रेम केले असेही ते म्हणाले. रिया अटकेसाठी तयार असल्याची माहिती तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रविवारीच दिली होती. “जर एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल, तर तिला तिच्या प्रेमाचे परिणाम भोगावे लागतील. निर्दोष असल्याने, तिने बिहार पोलिसांसह सीबीआय, ईडी आणि एनसीबीने दाखल केलेल्या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतली नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.

रियाने सुशांतच्या बहिणींविरूद्ध केली तक्रार दाखल

दरम्यान, सोमवारी चौकशी संपल्यानंतर संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास  रिया चक्रवर्ती हिने  सुशांतसिंग राजपूत यांच्या बहिणींविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली दिली आहे.. रियाने सुशांतच्या दोन बहिणी प्रियांका आणि मितूच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर राजपूत कुटुंबाचे वकील के.के. सिंह यांनी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे फिर्यादीत म्हटले असून त्यांच्यावर  कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अधिक वाचा  सिझेरियन शस्त्रक्रिया करून महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन डॉक्टरांना 10 वर्षांची शिक्षा

 रियाच्या तक्रारीवरुन सुशांत सिंहची बहीण प्रियंका सिंह, डॉक्टर तरुण कुमार, मितू सिंह आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये आयपीसीचे कलम  420, 464, 465, 466, 468, 474, 306 120 बी / 34 आयपीसी आणि कलम 8 (1), 21,22, 29 एनडीपीएस अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एफआयआरमध्ये आरोपींनी  औषधाची चिट्ठी न ठेवता बनावट प्रिस्क्रिप्शन औषधाची पर्ची न ठेवता सरकारी रुग्णालयाच्या लेटर हेडचा वापर करुन बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून आणि डॉक्टरांच्या निर्देशांशिवाय सुशांतला एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी घातलेली औषधे दिली आणि त्यामुळे अँक्सिएटी अटॅक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे आणि म्हणूनच एखादी व्यक्ती आत्महत्या करु शकते, असे म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love