पूजा खेडकरचा ठावठिकाणा लागेना? : खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर

पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला
पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे(प्रतिनिधि)–स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वाशिम येथून निघाल्यानंतर तिचा कुठलाच ठावठिकाणा लागत नसल्याने तपास यंत्रणांपुढेही पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, पूजा खेडकर हिच्या आई वडीलांचा घटस्फोट खरंच झाला होता का? याबाबत पुणे पोलिसांनी तपास करुन त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.

पूजा खेडकर हिचे विविध कारनामे समोर आल्यानंतर तिची बदली वाशिम येथे करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नवनवीन कारनाम्यांची यादी अद्याप संपायला तयार नाही. पूजा खेडकर हिचे राज्य सरकारने  जिल्हा प्रशासनाचे प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तिला पुढील कारवाईसाठी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी इथं २३ जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र, पूजा मसूरीला गेली का नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही. पुणे पोलिसांनी पूजाला तीनवेळा नोटीस बजावून देखील ती पुणे पोलिसांसमोर हजर झालेली नाही तसेच दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, परंतु  ती अद्याप दिल्ली पोलिसांनाही भेटलेली नाही. त्यामुळे विविध तपास यंत्रणांसमोर पेच निर्माण झाला असून वाशिमहून निघालेली पूजा नक्की कुठे गायब झाली याचा ठावठिकाणा लागत नाही.

अधिक वाचा  जागतिक हवामान बदलांवर उपाययोजना राबविण्यात भारत अग्रेसर – अमिताभ कांत

पूजाच्या आई वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात तपासाचा अहवाल केंद्राकडे सादर

पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतण्यासाठी नॉन-क्रीमी लेयर सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यासाठी पूजा खेडकर तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचा दावा केला होता. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडिल दिलीप खेडकर यांच्या वैवाहिक संबधाबाबतचा तपास करून त्याचा अहवाल पुणे पोलिसांनी केंद्र सरकारला सादर केला आहे.

पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी नगरमधून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या शपथपत्रात मनोरमा खेडकरचा उल्लेख पत्नी म्हणून केला होता. पुणे पोलिसांनी याचा अहवाल केंद्राला पाठवला आहे.

दरम्यान खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट २०१० मध्ये झाला असला तरी त्यांच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी चौकशी करून महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब अहवालात नोंदवले आहेत. केंद्र शासनाकडून घटस्फोटासंदर्भात अहवाल मागवण्यात आला होता. पूजा खेडकर  हिने यूपीएससीच्या निवड प्रक्रियेमध्ये कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी जिंकली भव्य बक्षिसे

थर्मोव्हेरिटा कंपनीचा लिलाव होणार?

दरम्यान, पूजा खेडकरनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या कंपनीच्या पत्त्याचा वापर केला, त्या थर्मोव्हेरिटा कंपनीचा लिलाव केला केला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  या कंपनीने गेल्या तीन वर्षांचा २ लाख ७७ हजारांचा कर थकवला आहे. या प्रकरणी पिंपरी पालिकेने कंपनी सील केलेली आहे. मात्र हा कर २१ दिवसांत भरला नाही तर मालमत्तेचा लिलाव केला जातो, त्या नियमानुसार थर्मोव्हेरिटा कंपनीचा लिलाव केला जाऊ शकतो.

थर्मोव्हेरिटा कंपनी खेडकर कुटुंबाची असल्याचे आणि अनधिकृत असल्याचं उघड झालं आहे. २ लाख ७७ हजारांचा कर थकवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने थर्मोव्हेरिटा कंपनी १९ जुलैला सील केली आहे. ही कंपनीच अनधिकृत असल्याचीही माहिती समोर आली होती. रेडझोनमध्ये कंपनी उभारल्यामुळे ती अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालं होतं.

अधिक वाचा  पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरू:फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी

 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love