रामदास आठवले यांचा विधानसभेच्या आठ ते दहा जागांवर दावा

वाल्मिक कराडला कडक शासन व्हावे
वाल्मिक कराडला कडक शासन व्हावे

पुणे(प्रतिनिधि)—महायुतीला लोकसभेत अपयश आलं, यांची  अनेक कारणं आहेत. संविधान बदलणार असा प्रचार करून  इंडिया आघाडीने मतदारांना ब्लॅकमेल केलं. त्यांनी अफवा पसरवली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. याचा आम्हाला फटका बसला आहे. आता सर्व समाज आमच्यासोबत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत १७० ते १८० जागा निवडून आणायचा आमचा निर्धार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले. दरम्यान, रामदास आठवले यांनी विधानसभेच्या आठ ते दहा जागांवर दावा केला आहे.

रामदास आठवले म्हणाले, कॅबिनेटमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात अजिबात नाराजी नाही. महायुती आजही बळकट आहे. लोकसभेबाबत माझीही नाराजी होती. ती बाजूला ठेवून महायुतीमध्ये राहिलो आणि जोमाने कामाला लागलो. पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक मंत्रीपद देणार आहेत. लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नाही. पुढे ते म्हणाले, विधानसभेत आमचा आठ ते दहा जागांवर दावा आहे. त्या मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट घेऊन येत आहे  मराठी  ओटीटी प्लॅटफॉर्म  "अल्ट्रा झकास"