पुणे पदवीधरच्या निकालाला लागणार 40 तास ?चित्र स्पष्ट होण्यासाठी 9 वाजणार


पुणे –पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच  लागणार की पुढील फेऱ्यांची मतमोजणी करावी लागणार याबाबतचे चित्र पदवीधरसाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षक साठीचे चित्र साधारण सायंकाळी 7 वाजेपर्यत स्पष्ट होऊ शकते अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. दरम्यान, पहिल्या पसंतीमध्ये विजय न मिळाल्यास निकाल यायला सुमारे 40  तास लागण्याची शक्यता आहे.

सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली, सुरवातीला विभागातील पाच जिल्ह्याच्या मतपत्रिका तसेच पोस्टल मत पत्रिका एकत्र करण्यात आल्या, पदवीधर साठी 867 पोस्टल तर शिक्षकसाठी  32 पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत या सर्व मतपत्रिका सरमिसळ करण्याचे काम सुरू असून  ही प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारचे दोन वाजणार आहेत त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून वैध अवैध मत बाजूला करत असतानाच पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरसाठी भाजपकडून सांगलीचे संग्राम देशमुख

पोस्टल मतदानासह पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 917 तर शिक्षक साठी 53 हजार 19 इतके मतदान झाले आहे..या सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यातल्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या केल्या जात असतानाच विजयाचा कोटा ठरण्यासाठी  रात्रीचे नऊ वाजू शकतात असे विभागीय आयुक्तांनी सांगितले असून जर या प्रक्रियेत एखाद्या उमेदवाराने विजया साठीचा कोटा पूर्ण केला तर शिक्षक चा निकाल साधारण सायंकाळी 7 वाजता तर पदवीधर चा निकाल रात्री नऊ वाजता लागू शकतो. पहिल्या पसंतीच्या मतामध्येच विजय मिळवण्यासाठी वैध मतदान भागिले 2, अधिक 1 मत  आवश्यक आहे त्यामुळे एकतर्फी निवडणूक झाल्यास रात्री नऊ वाजता निकाल अपेक्षित आहे..पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण होऊ शकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत आणि ही प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या पदवीधर साठी 60 फेऱ्या तर शिक्षक साठी 32 फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत प्रत्येक फेरीसाठी अंदाजे अर्धा तास वेळ गृहीत धरल्यास निकाल लागण्यासाठी आज रात्री 9 नंतर पुढे 30 तास पदवीधरसाठी लागू शकतात तर शिक्षक साठी 16 तास लागू शकतात असा प्रशासनाचा अंदाज आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love