पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार

पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार

पुणे(प्रतिनिधि)–पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केलेल्या बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.  बदनामी केल्याने सुहास दिवसे गुन्हासुद्धा दाखल करण्याच्या तयारीमध्ये आहेत.

पूजा खेडेकरने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता. पूजा खेडकर पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी होती. मात्र तात्काळ तिची बदली वाशिम येथे करण्यात आली होती. प्रमाणपत्रांवरून आरोप होत असताना पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचा आरोप केला होता. वाशिम पोलीस पूजा खेडकर यांच्या शासकीय विश्रामस्थळी पोहोचले होते. दिवसे यांनी लैगिंक आणि मानसिक छळ केल्याचे पूजा खेडकरनी आरोप केले होते. ⁠वाशिम पोलिसांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा खेडकरची तक्रार नोंदवून घेतली. मात्र दिवसे यांच्याविरोधातील तक्रार वाशिम पोलीसांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ही तक्रार  पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला या तक्रारीसंदर्भात काही चौकशीसाठी तब्बल तीन वेळा समन्स पाठवून देखील ती गैरहजर राहिली होती.यावेळी वाशिम पोलिसांनी तक्रारीची नोंद केली होती.

अधिक वाचा  मोदींची लोकप्रियता वाढली- ट्विटरवर झाले सहा कोटी फॉलोअर्स

केंद्रीय लोकसेवा आयोगाने  पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून केलेली निवड रद्द केली आहे. भविष्यात आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला बसण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यूपीएससीने त्याला अनेक वेळा बनावट ओळख वापरून परीक्षेत बसल्याबद्दल दोषी ठरवले आहे. यूपीएससीने एका निवेदनात म्हटले आहे की, खेडकर ही नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे.

 

 

 

 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love