पुणे–पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील पुण्यातील आरोपी सौरव महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सौरव महाकाळ याला २० जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांना गोळ्या मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख दोन दिवसापूर्वी पटली होती. यातील ८ जणांचे फोटो समोर आले होते. यातील ८ पैकी दोन शूटर्स हे पुण्यातील आहेत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी पुण्यातील रहिवाशी आहेत. यातील सौरव महाकाळ याला आज पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. २ महाराष्ट्रातले, २ हरियाणातले, आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची गेल्या रविवारी (२९ मे) गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू झाला होता.
पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू झाला होता. मुसेवाला (२७) हे जवाहर के या त्यांच्या खेड्यात जीपमधून जात असताना झालेल्या AK 47 या बंदुकीने केलेल्या गोळीबार करण्यात आला. त्यावेळी ३२ राऊंड फायर करण्यात आले. त्यात त्यांच्या शरीरात १६ गोळ्या लागल्या. या घटनेमुळे हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली होती.