औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या ‘ध्रुपद स्वर’ दिनदर्शिकेचे प्रकाशन पं. अजय चक्रवर्ती यांच्या हस्ते संपन्न झाले

औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या ‘ध्रुपद स्वर’ दिनदर्शिकेचे प्रकाशन पं. अजय चक्रवर्ती यांच्या हस्ते संपन्न झाले
औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या ‘ध्रुपद स्वर’ दिनदर्शिकेचे प्रकाशन पं. अजय चक्रवर्ती यांच्या हस्ते संपन्न झाले

पुणे- पुण्यातील औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर हे श्रेष्ठ व्यक्तीमत्त्वांच्या प्रकाशचित्रांसाठी आणि त्यांवर आधारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक दिनदर्शिकांसाठी प्रसिद्ध आहेत. २०२५ सालासाठीही अशाच सुंदर दिनदर्शिकेची एक संग्राह्य अशी निर्मिती त्यांनी केली आहे. ‘ध्रुपद स्वर’ असे नाव असलेल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन काल पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या हस्ते सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये करण्यात आले. ज्येष्ठ धृपद गायक पंडित उदय भवाळकर, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, अर्चना केले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सतीश पाकणीकर यांच्या ‘थीम कॅलेंडर’चे हे तेवीसावे वर्ष असले तरीही मध्यंतरीच्या (२०११, २०१२ व २०१३) या तीन वर्षात त्यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासाठी निर्माण केलेल्या तीन थीम कॅलेंडरचा विचार करता यावर्षीचे कॅलेंडर २६ वे कॅलेंडर असेल. कलावंतांच्या भावमुद्रा, त्यांचे विचार, संगीताबद्दल कलाकारांनी व्यक्त केलेली मते, सादरीकरणात त्यांना झालेला आनंद, वेगवेगळ्या बंदिशी व काव्य अशा आयामांनी सजलेली ही थीम कॅलेंडर्स रसिकांच्या पसंतीला उतरली आहेत.

अधिक वाचा  चांगुलपणाला जात-धर्माचा संबंध नसतो : डॉ. श्रीपाल सबनीस

आपल्या आवडत्या कलावंतांची मोठ्या आकारातील संग्राह्य अशी प्रकाशचित्रे रसिकांना उपलब्ध व्हावीत, हा दृष्टिकोन ठेवून २३ वर्षांपूर्वी सुरू केलेला थीम कॅलेंडरचा हा उपक्रम यशस्वी होण्यास अर्थातच सर्वथा रसिकच कारण आहेत असे सतीश पाकणीकर यांनी आवर्जून नमूद केले.

कालावधीत कलावंतांची सुमारे २५० प्रकाशचित्रे चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यात पाकणीकर यशस्वी झाले आहेत. यावर्षीच्या थीम कॅलेंडरसाठी त्यांनी विषय निवडलाय धृपद गायकी. सामगान-जातिगान व प्रबंध गान या संगीत कलेच्या अति प्राचीन शैली. त्यामधूनच आजच्या धृपद या संगीत परंपरेचा जन्म झाला आहे. म्हणजेच राग संगीताच्या विकासातील अगदी सुरुवातीच्या काळापासून जो मुख्य संगीत प्रवाह प्रचलित झाला तो म्हणजे धृपद संगीत. ऋषीमुनी तपस्वी व अनेकानेक संगीत साधक यांच्या प्रयत्नांमुळे धृपदचा प्रसार होत गेला. त्या बरोबरीने या संगीत प्रकाराला मिळालेला राजाश्रय हा ही एक महत्त्वाचा घटक ठरला.

अधिक वाचा  डिजिटल युगात खाजगी माहिती कोणालाही देऊ नये -रितेश भाटीया

ओमकार हा या संगीत प्रवाहाचे उगमस्थान तर भगवान शंकर हे या कलेचे आदी गायक मानले जातात. असे असल्याने या गायकीचा मूळ उद्देश हा लोकरंजन नसून आत्मशोध हा मानला गेला आहे.

जिथे शब्द नाहीत तिथे राग हा केवळ नादातून अथवा ध्वनीतून व्यक्त होतो आणि त्यातून विविध रसांची निष्पत्ती होते. हे धृपदपरंपरेचे वैशिष्ट्य आहे. ध्वनीची भाषा अमूर्त असल्याने मानवी विचारांच्या मर्यादेपलीकडे ती हृदयाची भाषा बनते. त्यामुळे धृपदसंगीत  हे आजपर्यंत शतकानुशतके खंबीरपणे टिकून राहिले आहे. धृपद संगीतामध्ये गायन आणि वीणा वादन हे दोन्ही अंतर्भूत आहे. या संगीत प्रकारात जी घराणी आहेत त्यांना ‘बानी’ असे संबोधले जाते. गौहर, खंडार, नौहर व डागर अशा या चार बानी. थीम कॅलेंडरच्या या सहा पानातून या संगीत प्रकारासाठी ज्यांनी अविरत कष्ट घेतले व देश विदेशात हे गायन-वादन पोहोचवण्यात जे यशस्वी झाले अशा काही कलावंतांचा समावेश आहे. या कलाकारांची निवड व ओळख रसिकांना करून दिली आहे ती आजचे आघाडीचे व ज्येष्ठ धृपद गायक पंडित उदय भवाळकर यांनी. संगीत रसिक या प्रयत्नाचे स्वागत करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love