चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आयएएस अधिकारी बनणे हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता

पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ
पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ

पुणे(प्रतिनिधि)–स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दिवसेंदिवस  आणखी कारनामे उघड होत आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांचे आयएएस अधिकारी बनणे हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकर यांनी अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात असतानाच त्यांनी ‘व्हिज्युअली इम्पेअर्ड’ म्हणजे दृष्टिदोष असल्याचं सर्टिफिकेट दाखवून आयएएस पदरात पाडून घेतल्याची माहिती उघड झाली आहे. यूपीएससीने सहा वेळा दिल्लीच्या एम्समध्ये वैद्यकीय चाचणीसाठी बोलावूनही त्या गेल्या नाहीत. कुठल्यातरी सेंटरमधून त्यांनी एमआरआय अहवाल मिळवला आणि त्या आधारे त्या कलेक्टर झाल्याचं सांगितलं जात आहे.

तसेच यूपीएससी आणि केंद्रीय नागरी सेवा न्यायप्राधिकरणाने (कॅट) ने विरोध केला असतानाही त्यांना आयएएस पद कसं देण्यात आलं? त्यांच्या नियुक्तीमागे कुठल्या राजकीय नेत्याने आपलं वजन वापरलं, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

काय आहेत पूजा खेडकर यांचे कारनामे?

अधिक वाचा  एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे देशात भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’ : देश विदेशातील १३० शास्त्रज्ञांचा सहभाग

पूजा खेडकर यांना २०२२ मध्ये युपीएससी परीक्षेत ८२१ वी रँक मिळून पास झाल्या. या रँकसह त्यांना आयएएस (IAS) दर्जा मिळणं शक्य नव्हतं, कारण त्यावर्षी ओबीसी कॅटेगरीतून आयएएस झालेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांची रँक ४३४ होती. म्हणजे या विद्यार्थ्यांपेक्षा पूजा खेडकर  यांची रँक दुपटीने मागे असूनही त्या आयएएस झाल्या. कारण त्यांनी त्यांना  ‘मल्टिपल डिसॅबिलिटीज असल्याचा दावा केला होता. मात्र त्याआधी २०१९ ला युपीएससीची परीक्षा देताना असा कुठलाही दावा केला नव्हता. विशेष म्हणजे ‘कॅट’ने त्यांचा हा दावा फेटाळल्यावरही पूजा खेडकर यांची आयएएससाठी निवड झाली. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पूजा खेडकर यांचं स्वतःच उत्पन्न ४२ लाख असताना आणि त्यांच्या वडिलांच्या नावे ४० कोटींची मालमत्ता असताना त्या ओबीसीमधून नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट कशा मिळवू शकल्या? हा प्रश्न विचारला जात आहे.

खेडकर कुटुंबाचे राजकीय लागेबांधे?

पूजा खेडकर या आयएएस कशा बनल्या याबाबतचं गूढ वाढत चाललं आहे. २०१९ ला सर्वसाधारण उमेदवार म्हणून परीक्षा देणाऱ्या पूजा खेडेकर युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण तर झाल्या मात्र त्यांना कमी मार्क्स असल्यामुळं आयएएसचा दर्जा मिळू शकला नाही. मग २०२२ ला पूजा यांनी त्यासाठी शक्कल लढवायचं ठरवलं.

अधिक वाचा  #भंडारा दुर्घटना: दोषींना कडक शासन करू, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही-अजित पवार

आपण फिजिकली डिसेबल म्हणजे शारीरिक दृष्ट्या अपंग आहोत असा दावा करत तसं सर्टिफिकेट युपीएससी ला सादर केलं. ‘दी पर्सन विथ बेंच मार्क डिसेंबलीटीज’ ही एक वेगळी कॅटेगरी युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये शारीरिक अपंगत्व किती प्रमाणात आहे. यावरून १, २, ३, ४, आणि ५ असे प्रकार ठरवण्यात आलेत. पूजा खेडकर यांनी यातील सर्वात खालची म्हणजे टाईप पाचची डिसेबलीटी असल्याचा दावा केला. त्यासाठी त्यांना दृष्टिदोष आणि मेंटल इलनेस असल्याचं सर्टिफिकेट सादर केलं. यामुळं युपीएससी परीक्षेत ८२१ क्रमांकाची रँक मिळूनही त्यांना आयएएस चा दर्जा मिळाला. त्यावर्षी युपीएससीच्या यादीत ओबीसी कॅटेगरीतून आयएएस झालेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांची रँक ४३४ होती . म्हणजे जवळपास दुपटीने मागे असूनही पूजा खेडकर आयएएस बनण्यात यशस्वी झाल्या, त्यामुळं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. दरम्यान, खेडकर कुटुंबाच्या राजकीय लाग्याबांध्यांमध्ये या प्रश्नांची उत्तरं दडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  पुणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार

वार्षिक उत्पन्नात तफावत 

पूजा खेडकर यांनी त्यांच्या उत्पन्नाबाबत दिलेल्या माहितीत त्यांची पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी आणि अहमदनगर जिल्यात तीन ठिकाणी जमीन असल्याचं म्हटलं आहे. या मालमत्तांची एकूण किंमत एक कोटी ९३ लाख रुपये असून त्यापासून पूजा यांना ४२ लाख रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकतीच नगर दक्षिण मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवताना त्यांच्या मालमत्तांची एकूण रक्कम चाळीस कोटी असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं. त्यामुळं ओबीसी कॅटेगरीतून सवलत मिळण्यासाठी आवश्यक असलेलं आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा असलेलं सर्टिफिकेट त्यांना कसं मिळालं? हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

 

 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love