सैन्य दलाच्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याला सिकंदराबाद येथून अटक

पुणे- भारतीय सैन्यदलातील शिपाई पदाच्या परीक्षेचा पेपर फोडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. त्याला सिकंदराबाद येथून तर त्याच्या साथीदाराला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. हा वरिष्ठ अधिकारी भारतीय सैन्य दलातील वेगवेगळ्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविणार्‍या सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख आहे.

भगतप्रितसिंग बेदी (रा. सिकंदराबाद) असे भरती प्रक्रिया प्रमुख लेफ्टनंट कर्नलचे नाव आहे. त्याचा साथीदार नारनेपाटी वीरप्रसाद (रा. दिल्ली) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

सैन्य दलातील कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांसाठी आर्मी शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षा २८ फेब्रुवारी रोजी भारतभरातील ४० केंद्रांवर होणार होती. या परिक्षेच्या प्रश्न पत्रिका फोडून  काही व्यक्ती ती प्रश्नपत्रिका व्हॉटसअपवरुन वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरघोस रक्कमेला विकणार असल्याची गोपनीय माहिती सर्दन कंमाड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. ही गोपनीय माहिती त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कळविली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या पथकाने वानवडी आणि विश्रांतवाडी परिसरात सापळा रचून कारवाई करून किशोर गिरी (रा. माळेगाव), माधव गित्ते (रा. सॅपर्स विहार कॉलनी, विश्रांतवाडी), गोपाळ कोळी (रा. बीईजी सेंटर, दिघी), उदय औटी (रा. बीईजी सेंटर, खडकी) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांना हा पेपर तामिळनाडु येथील आर्मी अधिकारी थिरु मुरगन याने दिल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक केली. हा पेपर त्याला दिल्लीतील अधिकारी वसंत किलारी याच्याकडून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली.

अधिक वाचा  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड

अटकअटक करण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी सुरू असताना, हा पेपर तामिळनाडू येथील सैन्य दलातील अधिकारी थिरू मुरुगन यांच्या मोबाईल व्हाट्सअप वरून आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून अधिक चौकशी केली असता, आणखी एक लष्करी अधिकारी वसंत किलारी यांना अटक करण्यात आली. या दोघांकडे सुरू असलेल्या अधिक चौकशीत भरती प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रितसिंग बेदी यांनी हा पेपर लीक केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने सिकंदराबाद येथे जाऊन त्यांना अटक केली. तर त्यांचा आणखी एक सहकारी नारनेपाटी वीरप्रसाद यांना दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

सैन्य दलातील कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांसाठी आर्मी शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षा २८ फेब्रुवारी रोजी भारतभरातील ४० केंद्रांवर होणार होती. या परिक्षेच्या प्रश्न पत्रिका फोडून  काही व्यक्ती ती प्रश्नपत्रिका व्हॉटसअपवरुन वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरघोस रक्कमेला विकणार असल्याची गोपनीय माहिती सर्दन कंमाड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. ही गोपनीय माहिती त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कळविली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या पथकाने वानवडी आणि विश्रांतवाडी परिसरात सापळा रचून कारवाई करून किशोर गिरी (रा. माळेगाव), माधव गित्ते (रा. सॅपर्स विहार कॉलनी, विश्रांतवाडी), गोपाळ कोळी (रा. बीईजी सेंटर, दिघी), उदय औटी (रा. बीईजी सेंटर, खडकी) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांना हा पेपर तामिळनाडु येथील आर्मी अधिकारी थिरु मुरगन याने दिल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक केली. हा पेपर त्याला दिल्लीतील अधिकारी वसंत किलारी याच्याकडून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली.

अधिक वाचा  #खळबळजनक : सिंहगड रस्त्यावर धारदार शस्त्राने आणि कोयत्याने सपासप वार करून खून

त्यानंतर सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रितसिंग बेदी यानेच पेपर लिक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भालेराव, हवालदार अतुल साठे व राजपूत यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन बेदी याला दिल्लीहून ताब्यात घेऊन अटक केली. नारनेपाटील वीरप्रसाद याला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, सहायक फौजदार वांजळे, पोलीस नाईक केकाण यांनी अटक केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love