Padam Shri Sheetal Mahajan will make a historic parachute jump from the world's highest peak, Mount Everest, from a Sameer helicopter.

जगातील सर्वाच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर समाेर हेलिकाॅप्टरमधून पदमश्री शीतल महाजन मारणार ऐतिहासिक पॅराशूट जंप : जगातील सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन ठरणार लँडिग करणारी जगातील पहिली महीला

क्रीडा पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- सर्वसामान्य घरातून पुढे येऊन स्कायडायव्हिंग क्षेत्रात वेगवेगळे विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या पुणे शहराची रहिवासी असलेली पदमश्री शीतल महाजन नवीन विक्रम प्रस्थापित करण्यास सज्ज झाली आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या सहाकार्याने जगातील सर्वाच्च शिखर असलेल्या नेपाळ स्थित माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मी) समोर २३ हजार फुट उंचीवरुन हेलिकॉप्टरमधून ऐतिहासिक पॅराशूट जंप मारणार आहे. (Padam Shri Sheetal Mahajan will make a historic parachute jump from the world’s highest peak, Mount Everest, from a helicopter.)

हवामानाच्या परिस्थितीनुसार ७ ते १५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान हा विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार आहे. देशाचे दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुरु केलेल्या ‘बेटी की उडान,देश का स्वाभिमान’ (मुलीचे उड्डाण किंवा यश हे राष्ट्राचा अभिमान आहे ) या घोषणेपासून प्रेरित होऊन इतकी मोठी मोहीम करण्याचे धाडस करण्यात येणार आहे. ही मोहीम केवळ व्यैक्तिक प्रयत्न नसून जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिमेचे प्रतिनिधीत्व करणारी आहे.

याबाबत शीतल महाजन म्हणाली, यापूर्वी मी २००४ मध्ये उत्तर ध्रुवावर आणि २००६ मध्ये दक्षिण ध्रुवावर तर २०१८ मध्ये जगातील सात खंडावर स्कायडायव्हिंग करुन विश्वविक्रम केला आहे. सन २००७ पासून माऊंट एव्हेरस्टच्या समोर पॅराशूट उडी मारण्याबाबतचे स्वप्न मी पाहिले होते व रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने ते पूर्णत्वास आता जात आहे. बर्फाच्छादित माऊंट एव्हरेस्ट येथे स्कायडायव्हिंगसाठी विशेष पॅराशूट उपकरणे आयवश्यक आहे, या सर्वाची सराव चाचणी मागील आठवडयात अमेरिकेत एॅरिझोना येथे करण्यात आली आहे.

माऊंट एव्हरेस्टच्या समोर २३ हजार फूट उंचीवरुन एएस३५० बी-३या हेलिकॉप्टर मधून संबंधीत पॅराशूट जम्प केली जाणार आहे. यामध्ये हेलीकॉप्टर मधून उडी मारल्यानंतर पक्ष्यासारखे आकाशात विहरत १६ हजार ते १८ हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडले जाणार आहे. माऊंट एव्हरेस्ट सर करताना तीन महत्वपूर्ण टप्पे समजले जातात. स्यांगबोचे (१२,४०२ फूट), अमादाबलम बेस कॅम्प (१५,००० फूट) व कालापत्थर (१७,५०० फूट) याठिकाणी देखील यावेळी पॅराशूट जंप हेलिकॉप्टर मधून करुन लँडिग केले जाणार आहे. या उंचीवर २६० ते ४०० चौरस फूटचे मोठे मुख्य पॅराशूट व समान आकाराचे राखीव पॅराशूट आवश्यक आहे.या मोहीमेत बर्फाच्छादित शिखर परिसरात पोटात गोळा येणारा पॅराशूट जंप अनुभव, नयनरम्य शेर्पा वस्तीचे नेत्रसुखद दृश्य, जगातील सर्वाच्च माऊंट एव्हेरस्टची पार्श्वभूमी, तर तितक्याच उंचीवरील शिखरांसह संपूर्ण डोंगरदरम्यांनचा अनुभव यावेळी अनुभवता येणार आहे.

सागरमाथा या राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन मोहीमेला सुरुवात करण्यात येणार आहे. युनेस्को  जागतिक वारसा क्षेत्रात स्यांगबोचे (१२,४०२ फूट) व अमादाबलम बेस कॅम्प (१५,००० फूट) हे जगातील दोन्ही सर्वाच्च ड्रॉप झोन हे. स्कायड्राव्हिंग क्रिडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रम प्रस्थापित करण्याचा बहुमान यामुळे मला मिळाला आहे. जगात देशाची प्रतिमा उंचवावी यादृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल आहे.

या मोहीमेत होणार हे विक्रम      

जागतिक विक्रम –

– जगातील सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन लँडिग करणारी जगातील पहिली महीला

– जगातील तीन्ही ध्रुवांवर पॅराशूट जंप करणारी जगातील पहिली महिला – उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव व जगातील तिसरा ध्रुव म्हणजे माऊंट एव्हरेस्ट

राष्ट्रीय विक्रम –

– माऊंट एव्हरेस्ट समोर पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन उतरणारी पहिली भारतीय महिला

– सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन ध्वज घेऊन उतरणारी भारतीय पहिली महिला

– सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन उतरणारी भारतीय पहिली महिला

– जगातील तीन ध्रुव म्हणजेच उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि माऊंट एव्हरेस्ट येथे पॅराशूट जंप करणारी पहिली भारतीय महिला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *