केंद्र सरकारने दिली स्वस्त दराने सोने खरेदी करण्याची संधी: आजपासून फक्त पाच दिवस


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ- उतार होत असली तरी एकूणच सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे. सोन्याचे भाव वाढत असताना केंद्र सरकारने जनतेला स्वस्त दराने सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

केंद्र सरकारच्या सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या (Sovereign Gold Bond) योजनेंतर्गत गुंतवणूकदार बाजारभावापेक्षा बऱ्याच कमी किमतीत सोने करू शकतात. ही योजना केवळ पाच दिवसांसाठी असून आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही योजना समजून घेणे आणि गुंतवणुकीसाठी उशीर करून चालणार नाही. आज(दि. १२ ऑक्टोबर) या योजनेचा पहिला दिवस आहे. या योजनेंतर्गत सोने खरेदी केल्यास त्याच्या विक्रीवरील नफ्यावर प्राप्तिकर नियमांत सूट मिळण्याबरोबरच आणखी बरेच फायदे असतील. त्यामुळे आपण या योजनेबद्दल जाणून घेऊ या.

अधिक वाचा  दुस-या आणि तिस-या स्तरावरील शहरांत (शॅडो सिटी)व्हर्च्युअल माध्यमातून घरखरेदी साठी वाढती मागणी

 या योजनेतील गुंतवणूकीचा कालावधी आजपासून 12 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाला असून  16 ऑक्टोबर 2020 ला या योजनेचा अखेरचा दिवस आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी सरकारने पाच दिवसांचा अवधी दिला आहे. सोन्याच्या बाँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 2020-21 या आर्थिक वर्षासाठीची  ही सातवी मालिका केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. पहिली मालिका 20 एप्रिल 2020 रोजी सुरू झाली आणि 24 एप्रिल 2020 रोजी संपली होती.

किती असणार सोन्याची किंमत

या योजनेंतर्गत तुम्ही प्रति ग्रॅम 5,051 रुपये दराने सोने खरेदी करू शकता. म्हणजेच एक तोळा अर्थात 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला 50,510 द्यावे लागतील आणि जर या गोल्ड बॉन्डची  ऑनलाईन खरेदी केली तर अशा गुंतवणूकदारांना सरकारकडून 50 रुपये प्रतीग्रॅम सुत दिली जाणार आहे.   म्हणजेच ऑनलाइन सोने खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 5,001 रुपये द्यावे लागतील.तर एक तोळा म्हणजेच १० ग्रॅम  सोन्यासाठी आपल्याला 50,010 रुपये द्यावे लागतील.

अधिक वाचा  अपर्णा एन्टरप्राईझेस पुढील ४ वर्षांत करणार अल्तेझा ब्रँड मध्ये १०० कोटींची गुंतवणूक

कुठे कराल खरेदी आणि कशी मिळेल आयकरात सूट

भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक हे बॉंड जारी करते. आपण हे गोल्ड बॉंड बँक, टपाल कार्यालये, एनएसई आणि बीएसई व्यतिरिक्त स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फतही खरेदी करू शकतो.

सोन्याच्या बाँडचा कालावधी आठ वर्षांचा असतो आणि एका वर्षाकाठी त्यावर 2.5% व्याज मिळते. बॉण्डवर जमा झालेले व्याज गुंतवणूकदाराच्या टॅक्स स्लॅबनुसार करपात्र असते, परंतु, त्यातून टीडीएस कापून घेतला जात नाही.

बाँडचे मूल्य 9 99  शुद्धतेच्या सोन्याच्या शेवटच्या तीन दिवसांच्या कामकाजाच्या बंद झालेल्या सरसरी बाजारभावावर आधारित आहे.  (इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने प्रकाशित केलेले). आपण या बॉंडमध्ये किमान गुंतवणूक एक ग्रॅम सोन्याची आणि जास्तीत जास्त चार किलो प्रती व्यक्ती करू शकता. हिंदू अविभाजित कुटुंबासाठी गुंतवणूकदाराची कमाल मर्यादा चार किलो आहे. विश्वस्त संस्था आणि तत्सम युनिट्ससाठी गुंतवणुकीची मर्यादा 20 किलो आहे. अर्थसंकल्पात सरकारने सोन्यावरील  आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांपर्यंत वाढविली आहे. त्याचबरोबर जागतिक स्तरावर वाढीव खरेदीमुळे सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला सरकारी योजनेंतर्गत सोने खरेदीचा फायदा होऊ शकेल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love