मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहेमीच सोशल मिडियावरील त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून टार्गेट करण्याची एकही संधी त्या सोडत नाही.
अमृता फडणवीस यांचा काल वाढदिवस होता. त्यांनी बहुधा तो कुटुंबाबरोबर साजरा केलेला दिसतो. त्यांनी त्यांचा चेहऱ्याला केकचे ठिपके लावलेला वाढदिवसाचा फोटो त्यांच्या ट्वीटर आणि फेसबूक या दोन्ही अकाऊंटवर शेअर करत ‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है !’ असा मजकूर त्यासोबत लिहिला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्यांना ट्रोल देखील केले आहे.
काल त्यांनी ‘पहचान कौन’ या शीर्षकाखाली हिंदीमध्ये ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यांनी
पहचान कौन?
एक राजा जो-
महल की चौखट से निकलता नही
अवाम से कभी मिलता नही
सत्य और कर्म की राह पर चलता नही
वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही
महामारी का कहर उससे सम्हलता नही
प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही !
सच है, धोखा कभी फलता नही।
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?
असे ट्वीट केले होते.
राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. त्या अनुषंगाने अमृता फडणवीस यांनी हे ट्वीट केले होते.
















