पुणे – उद्योजिका आणि मनोरंजन उद्योगातील आयकॉन एकता कपूर आणि ग्लान्स या कन्झ्युमर इंटरनेट कंपनीच्या मालकीच्या रोपोसोने एक या होम डेकोर, होम फर्निशिंग आणि वेलनेस ब्रँडच्या सादरीकरणारची घोषणा केली. ग्लान्स कलेक्टिव्हच्या माध्यामातून रोपोसोतर्फे पहिल्यांदाच एखादे लेबल सादर केले जात आहे. ग्लान्स कलेक्टिव्ह ही ग्लान्स आणि कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्क यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.
एक कलेक्शनमागे भारताच्या संपन्न आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वेलनेस पद्धतींची प्रेरणा आहे आणि यातील सिग्नेचर उत्पादनांमध्ये पारंपरिक आणि समाकालीन डिझाइन घटकांचा मेळ साधला जाईल. एकच्या कॅटलॉगमध्ये बेड लाइन्स, कुशन कव्हर्स, ड्रेप्स, टेबल रनर असे होम फर्निर्शिंग, वॉल आर्ट, वास, सर्व्ह वेअर असे होम डेकोर प्रोडक्स, धूपदाणी, हमसा अशी अध्यात्मिक आणि वेलनेस उत्पादने आणि दृष्ट लागू नये म्हणूनची ज्युलरी अशा अनेक वस्तू असणार आहेत. या उत्पादनांमधून एकता यांची अनोखी स्टाईल प्रतित होणार आहे.वापरकर्त्यावर सकारात्मक भावनिक परिणाम करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या घटकांचा यात वापर करण्यात आला आहे.
भारतातील उत्तम कारागिरीचा वारसा जपून त्यास प्रोत्साहन देण्याच्या एकच्या मोहिमेचा भाग म्हणून एकमधील अनेक उत्पादनांची निर्मिती देशभरातील स्थानिक कलाकारांच्या सहयोगातून करण्यात आली आहे. राजस्थानातील बागरू येथील पद्मश्री पुरस्कार विजेते राम किशोर चिपा यांनी एकसोबत बागरू संकल्पनेतील होम डेकोर साकारले आहे.
याबाबत बोलताना एकता कपूर म्हणाली की आपल्या कलेतून भारतीय वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी धडपडणाऱ्या स्थानिक कारागिरांना सक्षम करण्याचा एक हा माझा मार्ग आहे रोपोसोसोबतची भागीदारी फार उत्साहवर्धक आहे. कारण त्यामुळे या प्रयत्नांना तंत्रज्ञान, व्यापकता आणि वितरणाचे पाठबळ मिळेल. ग्लान्स आणि रोपोसोसारख्या व्यासपीठाच्या माध्यामातून देशातील कानाकोपऱ्यात स्थानिक कलाकारांचे काम पोहोचू शकेल याची खातरजमा होण्यासाठी हे पाठबळ फार आवश्यक आहे. आपल्या देशात असलेले वेलनेसचे सखोल ज्ञानही यामुळे वृद्धिंगत होईल आणि ते आजच्या युगाशी सुसंगत आणि उपलब्ध असेल.
ग्लान्सची मालकी असणाऱ्या इनमोबी ग्रूपचे संस्थापक आणि सीईओ नवीन तिवारी म्हणाले की सेलिब्रिटीज आणि क्रीएटर्सचे व्यक्तिमत्त्व प्रतित होईल अशा ब्रँड्च्या निर्मितीसाठी या सेलिब्रिटी आणि क्रीएटर्ससोबत जोडले जाणे हा आमचा उद्देश आहे आणि एकमध्ये नेमके हेच आम्ही करत आहोत. एकता कपूर यांच्या सहकार्याने या व्यवसायातील पहिले लेबल सादर करताना आम्हाला फार आनंद होत आहे. त्यांची कलात्मक तत्वे आणि होम, लाईफस्टाइल आणि वेलनेस विभागातील उत्तम जाण यामुळे त्या आमच्यासाठी सुयोग्य भागीदार आहेत. ग्लान्स आणि रोपोसोसारख्या व्यासपीठांचे एकत्रित वापरकर्ते आणि लाइव्ह कॉमर्स टेक्नॉलॉजीमुळे एक भारतातील लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल.