निकमार विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लावली हजेरी

निकमार विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लावली हजेरी
निकमार विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लावली हजेरी

पुणे : माजी विद्यार्थी मेळावा हा केवळ एक कार्यक्रम नाही तर भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्याची संधी आहे. हे लक्षात घेऊन, निकमार विद्यापीठाने, असोसिएशन ऑफ ग्लोबल निकमारियन्सच्या सहकार्याने, अस्पायर २.० ग्लोबल अ‍ॅल्युमनी मीट २०२५ चे आयोजन केले.या परिषदेत ५० हून अधिक देशांमध्ये काम करणारे निकमार विद्यापीठातील ३०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

दुबई, कतार, मध्य, पूर्व आणि उत्तर अमेरिकेतील विविध मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर असलेले विद्यार्थी येथे उपस्थित होते. या शिवाय हे विद्यार्थी एल अँड टी, एसपीसीएल, एचसीसी, सीबीआरई, हिल्टी, केईसी इंटरनॅशनल, अल तायर ग्रुप आणि इतर मोठ्या कंपन्यांमध्ये सेवा देत आहेत.

या परिषदेत, प्रमुख पाहुणे म्हणून निकमार विद्यापीठाचे माजी महासंचालक डॉ. मंगेश कोरगांवकर उपस्थित होते. तसेच, निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलपती डॉ. अनिल कश्यप, कुलगुरू डॉ. सुषमा कुलकर्णी, सीएसआईएएआरचे डीन डॉ. जनार्दन कोनेर आणि अ‍ॅल्युमिनाई रिलेशन्स प्रमुख डॉ. वंदना भावसार उपस्थित होते.

अधिक वाचा  आळंदी देवाची येथे हिमालयीन समर्पण ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन

मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सांगितले की, निकमार येथे मिळणारे शिक्षण, संस्कृती आणि आचरण मानवी आणि तांत्रिक गुणांचा विकास करते. आज आपण जे काही आहोत ते येथे मिळालेल्या शिक्षणामुळेच आहोत. तसेच माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सध्याच्या विद्यार्थ्यांना यश मिळविण्याच्या युक्त्या सांगितल्या, त्यांच्या विद्यार्थी जीवनातील अनुभव सांगितले. मुलांना यशस्वी होण्याचे मार्ग सांगतांना त्यांनी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या परिषदेने असाच एक अनोखा अनुभव दिला ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या समृद्ध पंरपरा आणि त्यांच्यातील मौल्यवान नातेसंबंध पुन्हा जिवंत करता आले.

डॉ. मंगेश कोरगांवकर म्हणाले, “ज्या निकमार विद्यापीठाचे बीज आपण पेरले हेाते ते आज वटवृक्ष बनले आहे याचा मला खूप आनंद आहे. आम्ही माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विद्यार्थी विकासासाठी एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होईल. देशाच्या आर्थिक विकासासाठी येथील विद्यार्थी जगाच्या कानाकोपर्‍यात जागतिक स्तरावर आपली सेवा देत आहेत. याशिवाय, येथील विद्यार्थी जगात होत असलेल्या बदलांना देशात राबवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत आहेत.”

अधिक वाचा  राज्यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे- पंकजा मुंडे

डॉ. अनिल कश्यप म्हणाले, “या विद्यापीठाचे ४० हजारांहून अधिक विद्यार्थी जगातील ५० हून अधिक देशांमध्ये उच्च पदांवर सेवा देत आहेत. आम्ही येथील विद्यार्थ्यांना १०० टक्के रोजगार देण्यास सक्षम आहोत. याचे मुख्य कारण म्हणजे आपण कुशल मनुष्यबळ तयार करतो.”

डॉ. सुषमा कुलकर्णी म्हणाल्या, “येथील विद्यार्थी आमचे सर्वात मोठे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. ‘अग्नि’ नावाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहोत.” कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. वंदना भावसार यांनी सर्वांचे आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love