नियोने नियोएक्स सुरु करण्यासाठी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेसोबत केली भागीदारी


पुणे -नियो या भारतातील आघाडीच्या प्रीमियर बँकिंग फिनटेकने इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि विजा यांच्यासोबत भागीदारी करत नियोएक्स ही अत्याधुनिक मोबाईल बँकिंग सुविधा मिलेनियल्ससाठी अर्थात सध्याच्या युवा पिढीसाठी सुरु करत असल्याची घोषणा केली आहे.  २०२१ वर्ष अखेरपर्यंत २० लाख ग्राहकांना या सेवेमध्ये सामावून घेण्याचे कंपनीचे उद्धिष्ट आहे.

ही सेवा सुरु करण्याआधी नियोने संपूर्ण देशभरात एक सर्वेक्षण केले होते.  महानगरे आणि इतर शहरांमध्ये राहणाऱ्या ८००० मिलेनियल्सना यामध्ये सहभाग करवून घेण्यात आले होते. कोविड-१९ महामारीनंतरच्या काळात मिलेनियल्सच्या बँकिंग गरजा नेमक्या काय आहेत ते या सर्वेक्षणात समजून घेण्यात आले. या अभ्यासामधून असे आढळून आले की, ७० टक्के भारतीय मिलेनियल्स हे डिजिटल बँकिंगकडे वळलेले आहेत आणि याचे मुख्य कारण यामध्ये ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधाजनक सेवा हे आहे.

अधिक वाचा  स्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे भारतात पहिल्यांदाच ब्रेलमध्ये विमा योजना लाँच

विशेष म्हणजे यापैकी ५५ टक्के जणांनी सांगितले की रिवॉर्ड्स आणि ऑफर्ससाठी ते आपली बँक बदलायला तयार आहेत आणि ४५ टक्के लोक अधिक जास्त व्याज दरासाठी बँक बदलायला तयार आहेत. या सर्व गरजा, इच्छा समजून घेऊन, त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियो एक्समध्ये या उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम ००७ बँकिंग  वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.  म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीवर ० टक्के कमिशन, खाते देखभाल शुल्क शुन्य आणि खात्यामधील शिल्लक रकमेवर ७ टक्के पर्यंत व्याज ही याची खास वैशिष्ट्ये आहेत.

नियोचे सह-संस्थापक व सीईओ श्री. विनय बागरी यांनी सांगितले, भारतातील आघाडीचे डिजिटल बँकिंग फिनटेक स्टार्टअप म्हणून ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा व अधिक समृद्ध अनुभव उपलब्ध करवून देण्यावर आमचा भर आहे.  बँकिंग क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाप्रती आमची वचनबद्धता यामधून दिसून येते.  इक्विटास एसएफबीसोबत धोरणात्मक भागीदारीमार्फत आमचे सर्वात महत्त्वाकांक्षी उत्पादन सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे यामध्ये आम्ही शक्य होईल तितके सर्वोत्कृष्ट बचत खाते आणि त्यासोबत या श्रेणीतील सर्वोत्तम गुंतवणूक खाते देणार आहोत आणि हे सर्व नियोच्या नेहमीच्या अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या आणि आनंददायी युजर इंटरफेसमध्ये एकत्र करण्यात येणार आहे.  आम्हाला पक्की खात्री आहे की, लवकरच हे अतिशय लोकप्रिय आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे बँकिंग उत्पादन बनेल.

अधिक वाचा  सिल्व्हर लेक करणार रिलायन्स रिटेलमध्ये 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे चीफ डिजिटल ऑफिसर श्री. वैभव जोशी यांनी सांगितले, निओबँकिंग हा बँकिंगमधील यापुढचा अतिशय मोठा टप्पा आहे.  या क्रांतिकारी उपक्रमासाठी नियोसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  उपयोगाला, ग्राहकांच्या गरजांना अनुसरून डिजिटल बँकिंग उत्पादने निर्माण करणे ही आजची गरज आहे.  आमच्या निओबँक आणि फिनटेक प्रोग्राम्समधून नेमके हेच करणे हा आमचा उद्देश आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love