भारत सरकारच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागातर्फे एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसच्या वीर्य केंद्रांना भारतातील सर्वोत्कृष्ट वीर्यकेंद्रामध्ये अव्वल स्थान

NDDB Dairy Services' semen centers are ranked among the best semen centers in India
NDDB Dairy Services' semen centers are ranked among the best semen centers in India

पुणे- भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या डीएएचडीने नुकत्याच जाहीर केलेल्या गुणपत्रिकेत महाराष्ट्रातील एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसच्या (एनडीएस) मालकीच्या राहुरी वीर्य स्टेशनने सर्वाधिक गुण मिळवले आहेत. गुणवत्ता, प्राण्यांचे अनुवंशशास्त्र, आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉल अशा विविध निकषांवर स्कोअरिंग करण्यात आले. अन्य तीन एनडीएस स्थानकांना ‘अ’ मानांकन मिळाले आहे, अशी माहिती कंपनीच्यावतीने येथे देण्यात आली.

मंत्रालयाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागांतर्गत येणाऱ्या सेंट्रल मॉनिटरिंग युनिटने (सीएमयू) २०२२-२३ या वर्षासाठी देशभरातील ५५ वीर्य स्टेशनच्या तांत्रिक लेखापरीक्षण अहवालात राहुरी वीर्य स्टेशनला ९७ गुण देण्यात आले असून उत्तर प्रदेशातील अॅनिमल ब्रीडिंग सेंटर, सलून (एनडीएस स्टेशन) ला ९५ गुण देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  ३५ व्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवाचे २३ सप्टे. रोजी हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन : मिस पुणे फेस्टिव्हल, मिसेस पुणे फेस्टिव्हल, पेंटिंग, नृत्य, ब्रायडल मेकअप, पाककला अशा विविध स्पर्धांचे आयोजन

सीएमयूच्या अहवालात एकूण नऊ वीर्य केंद्रांना ग्रेड ए अंतर्गत ९० किंवा त्यापेक्षा जास्त गुण देण्यात आले. गुजरातमधील साबरमती आश्रम गोशाळा, बिडज आणि तामिळनाडूतील अलमादी वीर्य स्टेशन या दोन एनडीएस स्टेशनचा समावेश आहे. अन्य स्टेशनमध्ये एसएलबीटीसी हेसरगेटा येथे कर्नाटक सरकारचे स्टेशन; धोनी येथे केरळ सरकारचे स्टेशन; पूर्णिया येथे बिहार सरकारचे स्टेशन, उरळीकांचन येथे बायफचे स्टेशन आणि बीएसएसआरसी हिसार यांचा समावेश आहे.

एनडीडीबीचे अध्यक्ष आणि एनडीएसचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा म्हणाले की, “हा आमच्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि यामुळे आम्हाला दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि देशी जातींच्या अनुवंशशास्त्राच्या प्रसारासाठी काम करणाऱ्या पशुवैद्यकीय तज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या पथकांच्या समर्पणाला याचे श्रेय जाते.

अधिक वाचा  जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार : मुरलीधर मोहोळ

एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसद्वारे चालविली जाणारी वीर्य केंद्रे ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम व्यावसायिक रित्या व्यवस्थापित वीर्य केंद्रांपैकी एक आहेत. ही स्टेशन गुणवत्तेच्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करतात आणि रोगमुक्त वीर्य तयार करण्यासाठी कठोर जैव-सुरक्षा उपाययोजना अंमलात आणतात. सीएमयूचा मूल्यमापन अहवाल आणि आमच्या वीर्य स्टेशन ला मिळालेले गुण आमच्या प्रक्रिया आणि कौशल्याची पुनरावृत्ती करतात, असे ते म्हणाले.

एनडीएस स्टेशनमध्ये 35 जातींचे 1,800 वळू आहेत ज्यांनी 2022-23 च्या मूल्यांकन कालावधीत एकत्रितपणे 5.2 कोटी डोसची विक्री केली आणि विवो आणि इनविट्रो भ्रूण उत्पादन आणि हस्तांतरणात देखील सक्रियपणे सामील आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love