पुणे : राज्य सरकारच्या निर्णयानुसार संचारबंदी लागू झाली असुन, पुणे महापालिकेच्या पुर्वीच्या निर्णयानुसार शहरात शनिवार आणि रविवार हे सलग दोन दिवस १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी आदेश जारी केले आहे.
मंगळवारी राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभुमीवर आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासंदर्भात आदेश काढले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार शहरांत बुधवारी सांयकाळी सहा वाजता संचारबंदी लागू केली आहे. नागरीकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तर शनिवार आणि रविवार शहरात लॉकडाऊन असेल. या दोन दिवशी शहरातील औषध विक्री आणि दुध विक्री सुरू राहणार आहे.
हे सुरू राहणार : आरोग्य सेवेशी निगडीत सर्व सेवा, पशु वैद्यकीय सेवा, पाळीव प्राणी खाद्य विक्री, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, किराणा – भाजीपाला -डेअरी – मिठाई सर्व खाद्यपदार्थांची दुकाने, शीतगृहे आणि गोदाम सेवा, पीएमपीची अत्यावश्यक सेवा आणि रिक्शा , टॅक्सी, विमान आणि रेल्वे सेवा, रिझर्व बॅंकेने जाहीर केलेल्या सर्व अत्यावश्यक सेवा, सेबी आणि सेबीशी संबंधित सेवा देणारी कार्यालये, दुरसंचार सेवा आणि देखभाल दुरुस्ती, मालवाहतुक, कृषी संबंधित सेवा, ई कामर्स केवळ अत्यावश्यक वस्तु आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी, पेट्रोल पंप, सर्वप्रकारच्या कार्गो आणि कुरीअर सेवा, माहीती तंत्रज्ञान क्षेत्र, विद्युत व गॅस वितरण सेवा, एटीएम, टपाल सेवा, मटण – अंडी -चिकन – मासे विक्री , रेस्टारंट – बार – हॉटेल मधील पार्सल सेवा, वकिल, सीए आणि वि य संस्थेशी संबंधित कार्यालय, खाद्यपदार्थांचे स्टॉल सकाळी सात ते सांयकाळी सहा यावेळेत केवळ पार्सल सेवेसाठी सुरू.
हे बंद राहणार : चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क, व्हिडिओ गेम पार्लर, व्यायामशाळा, जलतरण तलाव, क्रीडा संकुल, क्लब, सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर, चित्रपट – मालीकांचे चित्रीकरण, उद्याने, मैदाने, स्पा, सलुन, ब्युटीपार्लर, शाळा, महावीद्यालये, सामाजिक – सांस्कृतिक – राजकीय – धार्मिक कार्यक्रम , सभा – संमेलन, लग्नसमारंभासाठी केवळ पंचवीस लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कार आणि दशक्रीया विधीसाठी वीस लोकांची उपस्थितीस परवानगी
अत्यावश्यक सेवेसाठींचे नियम : कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे, ग्राहकांशी थेट संपर्क येईल अशापद्धतीने कार्यवाही करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रत्येकी पाचशे रुपये आणि आस्थापनांकडून एक हजार रुपये दंड वसुल केला जाईल. रिक्षात प्रवास करण्यासाठी चालक आणि दोन प्रवासी यांना परवानगी, टॅक्सी, कॅब मध्ये क्षमतेच्या निम्मे प्रवासी घेण्यास परवानगी, प्रत्येक ट्रीपपनंतर वाहन सॅनेटाईज करणे बंधनकारक, रेल्वेत उभ्या प्रवाश्यांना परवानगी नाही, घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण आणि पंधरा दिवस ग्राह्य मानला जाणारा कोरोना चाचणीचा अहवाल, ओळखपत्र बाळगणे आवश्यक.