मनसे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेणार मेळावे – राजेंद्र वागस्कर

MNS will hold meetings for the campaign of Mahayuti candidate
MNS will hold meetings for the campaign of Mahayuti candidate

पुणे- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधरअण्णा मोहोळ यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करतील व त्यांचे मताधिक्य वाढवे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी ग्वाही मनसेचे नेते आणि पुणे लोकसभा प्रभारी राजेंद्र वागस्कर व मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली.

प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भाजपा आणि मनसे च्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा चे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा संयोजक राजेश पांडे,लोकसभा प्रभारी श्रीनाथ भीमाले,महायुतीचे समन्वयक व प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,पुणे शहर सरचिटणीस राजेंद्र शिळमकर, रवींद्र साळेगावकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे उपस्थित होते तर मनसे च्या वतीने नेते राजेंद्र वागस्कर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे,प्रदेश सरचिटणीस गणेश सातपुते, प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे , योगेश खैरे प्रवक्ते मनसे इ पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद: कोण होणार विधानसभा अध्यक्ष?

मनसे ने महायुतीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याने निश्चितच आमची ताकद वाढली असून मुरलीधर मोहोळ हे मताधिक्याचा विक्रम करतील असा विश्वास वाटतो असे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले. मनसे चे कार्यकर्ते दैनंदिन प्रचारात तर सहभागी होतीलच पण स्वतंत्रपणे शहर पातळीवर आणि विधानसभा निहाय मेळावे आयोजित करण्यात येतील असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

मनसे च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय राखला जाईल व प्रचाराच्या नियोजनात मनसे चा सहभाग असेल असे महायुती चे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love