पुणे- भारतातील सर्वांत मोठ्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या रिटेल चेन्सपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने आपल्या पहिल्या दुकानाचे उद्घाटन केले. दि हब, आयटीआय रोड, औंध, पुणे येथे असलेल्या या दुकानाचे उद्घाटन आमदार सिध्दार्थ अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी श्री.फन्झीम अहमद, विभागीय प्रमुख (पश्चिम विभाग, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स), आणि इतर सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या. ६७०० चौ. फूट क्षेत्रात पसरलेल्या नवीन दुकानात दागिन्यांच्या डिझाईन्सची सर्वांत मोठी व्हरायटी तसेच फक्त ४.९ टक्क्यापासुन सुरू होणाऱ्या योग्य घडणावळ शुल्कासह रास्त किमतीला दागिने उपलब्ध आहेत. स्टोअरमध्ये नववधूचे दागिने, पारंपरिक, आधुनिक आणि कमी वजनाच्या सोन्याच्या, हिऱ्याच्या, मौल्यवान रत्नांच्या, प्लॅटीनमच्या, चांदीच्या आणि इतर अनेक दागिन्यांची मोठी रेंज आहे. तसेच येथे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या माईन डायमंड ज्वेलरी, इरा अनकट डायमंड ज्वेलरी, डिव्हाईन इंडियन हेरीटेज ज्वेलरी, एथनिक्स हँडक्राफ्टेड ज्वेलरी, प्रेशिया प्रेशस जेमस्टोन ज्वेलरी, झौल लाइफस्टाइल ज्वेलरी, विराझ पोलकी ज्वेलरी इ. लोकप्रिय सब-ब्रँडसची निवडक डिझाईन्ससुद्धा उपलब्ध आहेत.
नवीन दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी मलबार ग्रुपचे चेअरमन एम पी अहमद म्हणाले, औंध, पुणे मध्ये आमच्या नवीन दुकानाचा शुभारंभ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे दुकान महाराष्ट्राशी असलेले आमचे नाते अजून मजबूत करेल. या राज्यातील लोकांनी आम्हाला दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास हे आमच्या व्यवसायाच्या तत्त्वज्ञानाचे दोन मूलभूत आधारस्तंभ आहेत. आमच्या जागतिक दर्जाच्या सेवा आणि ग्राहक केंद्री वैशिष्टयांमुळे आम्ही जगभरातील सर्वांत विश्वासार्ह भारतीय ज्वेलर्सपैकी एक बनलो आहोत. आम्हाला सेवेची संधी दिल्याबद्दल आम्ही बारामतीच्या लोकांचे ऋणी आहोत.
व्यवसायात पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या ब्रँडचे खास वैशिष्टय़ उदा. संपूर्ण देशभरात सोन्याचा एकच दर देणाऱ्या एक भारत सोन्याचा एक दर आणि दागिन्यांच्या रास्त घडणावळीवर लक्ष केंद्रित करणारे रास्त किमतीचे वचन ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. दोन्ही योजनांचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या पैशांचे योग्य मूल्य देणे असा आहे.
आपल्या ग्राहकांप्रती असलेली ब्रँडची कटीबद्धता मजबूत करत मलाबार गोल्ड अँड डायमंड्स १० वचने देते. मलाबार वचनांमध्ये खड्याचे वजन, निव्वळ वजन आणि दागिन्यातील खड्याची किंमत दाखवणारा पारदर्शक किंमतीचा टॅग; दागिन्यांसाठी आयुष्यभर मोफत देखभाल; जुने सोन्याचे दागिने विकताना सोन्यासाठी १०० टक्के मूल्य; १०० टक्के एचयूआयडी अनुपालन करणारे सोने; जागतिक दर्जाची २८ पॉईंट गुणवत्ता तपासणी केलेले आयजीआय आणि जीआयए प्रमाणित हिरे, परत विकत घेण्याची हमी, अधिकृत सोर्सिंग आणि योग्य मजुरीची पद्धत यांचा समावेश आहे.
११ देशांमध्ये ३२५ पेक्षा जास्त दुकानांसह, हा जागतिक ज्वेलरी ब्रँड आपल्या रिटेल विस्ताराच्या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करत आहे आणि भारतात आपले स्थान मजबूत करत आहे. या ब्रँडने जेम्स आणि ज्वेलरी उद्योगातील सर्वांत प्रतिष्ठेचे कंपनी रोलवर सर्वांत जास्त नोकऱ्या आणि ग्लोबल रिटेलर ऑफ द इयर हे पुरस्कार जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेइपीसी) आयोजित केलेल्या ४८ व्या इंडिया जेम अँड ज्वेलरी अॅवॉर्ड्स (आयजीजेए) २०२१ मध्ये जिंकले.
ग्रुपच्या सीएसआर योजनांचा भाग म्हणून मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने बारामतीच्या दुकानातून मिळणारा ५ टक्के नफा या भागातील विविध धर्मादाय आणि लोकहिताच्या कामांसाठी देण्याची घोषणा केली आहे.