मा. गो. वैद्य यांचे निधन


नागपूर–विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य (मा. गो. वैद्य) यांचे शनिवार 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे.

अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #PM Narendra Modi : पुणे मतदारसंघातून लोकसभा लढविण्यासाठी मोदींची चाचपणी?