राज्यातील लॉकडाऊन वाढवणार -राजेश टोपे


मुंबई – राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत एक मे पर्यन्त लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. मात्र, अजूनही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असून. राज्यातील लॉकडाऊन आणखी वाढवला जाणार आहे. हा लॉकडाऊन किती दिवसांचा आणि कधिपर्यंत असेल याचा निर्णय शेवटच्या दिवशी म्हणजे एक मेला जाहीर करण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा लॉकडाऊन आणखी किती दिवस, काय सुरु राहणार व काय बंद राहणार हे शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

अधिक वाचा  लॉकडाऊन पूर्वी राज्यातील सर्व प्रकारच्या कामगारांचे वेतन, त्वरित देणे बंधनकारक करावे- भारतीय मजदूर संघ

राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love