लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या तरुणाला यूपीमधून अटक : एटीएसची कारवाई


पुणे – लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला पुणे एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली. इनामूल हक (रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन जुनैद महंमद (वय २८, सध्या रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि साथीदार आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) यांना अटक करण्यात आली होती.  दोघांकडून आठ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वी अटक केली होती. दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए तोयबासाठी काम करणाऱ्या जुनैद मोहम्मद याला पुण्यातून २४  मे ला अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली होती.  त्याला एटीएसच्या टीमने पुण्यातील दापोडी येथून अटक केली होती. त्यानंतर बंदी असलेल्या लष्कर ए तोयबा या संघटनेत भरतीसाठी कार्यरत असलेल्या आफताब हुसेन शाह याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) स्थानिक पोलिसांच्या मदतीने जम्मू- काश्मीरमधून एक जूनला अटक केली होती. न्यायालयाने त्याला १४  जूनपर्यंत एटीएस कोठडीत वाढ केली होती. मोहम्मद जुनैद याच्या संपर्कात तो होता. आत्ता या प्रकरणात उत्तर प्रदेश मधील सहारनपूर येथे पुणे एटीएसने कारवाई करत इनामुल याला तरुणाला ताब्यात घेतले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #blackmagic: जादुटोणासारखे अघोरी कृत्य करून व्यावसायिकाला कोट्यावधींचा गंडा : मुख्य आरोपीसह पत्नीला अटक