Koregaon Bhima Vijayastambha–कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ (Koregaon Bhima Vijayastambha)अभिवादन सोहळा येत्या १ जानेवारीला शौर्यदिनी (bravery day) होत असून, त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या कार्यक्रमासाठी सोमवारी होणारी गर्दी विचारात घेता परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार(Ritesh Kumar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरवर्षी शौर्यदिनी कोरेगाव भीमा(Koregaon Bhima) येथे विजयस्तंभास (Vijaystambha) अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व अनुयायी मोठय़ा संख्येने येत असतात. यंदाही विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी केली जात असून, सोहळय़ावर सीसीटीव्हीचीही नजर असेल. याशिवाय ४ अप्पर पोलिस आयुक्त, ११ पोलीस उपायुक्त, ४२ सहायक आयुक्त, ८६ पोलिस निरीक्षकांसह तीन हजार दोनशे अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलाच्या सहा तुकडय़ा, बॉम्बनाशक विरोधी पथक असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
त्याबरोबरच बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकाऱयांसह तीन हजार २०० अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलासह बाहेरील जिल्हय़ातील पोलीस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर परिसरातील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. विजयस्तंभ अभिवादनासाठी गतवषीच्या तुलनेत अधिक गर्दी होण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली असून वाहनांना पार्किंग, वाहतूक बदल आदींचे नियोनज करण्यात आले आहे.
वाहतुकीत बदल
दरम्यान, पुणे-नगर महामार्गावरील (Pune -Nagar Highway) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी (३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक बदल करण्यात येणार आहे. वाहतूक बदलाबाबतचे माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार असून, वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.