Kharadi Rave Party case : एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ जणांना पोलीस कोठडी, राजकीय षडयंत्राचा आरोप

Kharadi Rave Party case
Kharadi Rave Party case

पुणे(प्रतिनिधी)–पुणे शहराच्या उच्चभ्रू खराडी (Kharadi) भागातील एका आलिशान फ्लॅटवर रविवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास पुणे पोलिसांनी (Pune Police) धाड टाकून एका रेव्ह पार्टीवर (Rave Party) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्यासह एकूण सात जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या सातही जणांना न्यायालयाने २९ जुलैपर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे. (Kharadi Rave Party case)

अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) (वय ४१), प्रसिद्ध बुकी निखिल पोपटाणी (Nikhil Poptani) (वय ३५), समीर फकीर महमंद सय्यद (Sameer Fakir Mahamad Sayyad) (वय ४१),सचिन सोनाजी भोंबे (Sachin Sonaji Bhombe) (वय ४२), श्रीपाद मोहन यादव (Shripad Mohan Yadav) (वय २७), ईशा देवज्योत सिंग (Isha Devjyot Singh) (वय २२), प्राची गोपाल शर्मा (Prachi Gopal Sharma) (वय २२) यांचा समावेश आहे.

छाप्याचे स्वरूप आणि जप्त केलेला मुद्देमाल

रविवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. खराडीतील ‘स्टेबर्ड अझुर सूट’ (Stabburd Azur Suit) याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपींकडून एकूण ४१,३५,४०० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये २.७० ग्रॅम कोकेन (Cocaine) सदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा (Ganja) सदृश पदार्थ, १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू व बिअरच्या बॉटल, हुक्का फ्लेव्हर असा अमली पदार्थ व इतर साहित्य असे एकूण ४२ लाख रुपये  रोख किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या सर्वांची ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS) (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) कायद्याच्या कलम ८(क), २२(ब)(११)अ, २१(ब), २७, कोटपा ७(२), २०(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर खेवलकर यांना परत हडपसरच्या घरी आणण्यात आले. या घराची झाडाझडती घेत पोलिसांनी लॅपटॉप, हार्ड डिस्कसह विविध साहित्य जप्त केल्याचे समजते.

अधिक वाचा  कुख्यात गुंडाचा डोक्यात दगड घालून खून : पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

दरम्यान, रेव्ह पार्टीत सहभागी सात जणांना तपासणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात आज पहाटे आणण्यात आले. त्यांच्या तपासणी अहवालातील माहिती समोर आली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सात जणांना वैद्यकीय तपासणीसाठी आणले. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई सुरू होती. त्यात पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. त्यांनी मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन केले आहे का हे तपासण्यासाठी सर्वांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले. प्राथमिक तपासणीत दोघांनी मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. ससूनमधील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व आरोपींचे रक्त आणि लघवीचे नमुने सीलबंद करून पोलिसांच्या हवाली केले आहेत.

अधिक वाचा  पुण्यनगरीत अवतरला भक्तीचा महासागर : माउली व तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत

पोलिसांची कारवाई

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (Nikhil Pingle) यांनी या कारवाईबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, “पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित असताना गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री सव्वा तीनच्या सुमारास खराडी येथील रूम नंबर १०२, स्टेबर्ड अझुर सूट हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपींकडून एकूण ४१,३५,४०० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये २.७० ग्रॅम कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू व बिअरच्या बॉटल, हुक्का फ्लेव्हर असा अमली पदार्थ व इतर साहित्य जप्त केलं आहे. तसंच आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.”

न्यायालयातील सुनावणी आणि युक्तिवाद

रविवारी सुट्टीच्या दिवशी न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी सर्व आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी वकिलांनी ‘रेव्ह पार्टी’ हा शब्द वापरला असता, न्यायाधीशांनी तो शब्द वापरू नये असे सांगितले. आरोपींनी अमली पदार्थ कुठून आणले याचा तपास करायचा असल्याने ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

दरम्यान, प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे (Vijaysingh Thombre) यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी असा दावा केला की, ही संपूर्ण कारवाई राजकीय षडयंत्र (Political Conspiracy) रचून करण्यात आली आहे. तसेच, आरोपींनी कोणतेही अमली पदार्थांचे सेवन केले नव्हते आणि पोलिसांनीच अमली पदार्थ ‘प्लांट’ (Plant) केले असावेत असा आरोप त्यांनी केला. त्यांच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असून ते न्यायालयात सादर करतील, असेही त्यांनी सांगितले. खेवलकर यांना यापूर्वीही तीन वेळा अडकवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यांच्याकडे कोणताही अमली पदार्थ आढळला नाही, असेही वकिलांनी नमूद केले. पोलिसांनी साध्या वेशात येऊन व्हिडिओ शूटिंग केले असावे आणि त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सातही आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक वाचा  पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई: बनावट कॉल सेंटरवर छापा, अमेरिकन नागरिकांची लाखो डॉलर्सची फसवणूक उघड

खराडीतील पार्टी होती ‘आफ्टर पार्टी’?

दरम्यान, ही खराडीतील पार्टी खरंतर ‘आफ्टर पार्टी’ (After Party) होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्टीपूर्वी त्याच रात्री पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन पार्ट्या झाल्या होत्या: पहिली पार्टी कल्याणीनगरमधील (Kalyani Nagar) एका पबमध्ये रात्री १.३० वाजेपर्यंत सुरू होती. कल्याणीनगरचा पब बंद झाल्यानंतर काही जण मुंडवा (Mundhwa) भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले. तिथे पहाटे ३ वाजेपर्यंत दुसरी पार्टी सुरू होती, कारण पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या वेळेपर्यंत परवानगी असते.त्यानंतर तिसरी पार्टी स्टेबर्ड अझुर (Stabburd Azur) येथे सुरु होती.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love