धनकवडीत ११ गणेश मंडळांची संयुक्त अनोखी मिरवणूक : आदिवासींचे पारंपरिक नृत्य आणि संगीताने गणेश भक्त तल्लीन

धनकवडीत ११ गणेश मंडळांची संयुक्त अनोखी मिरवणूक
धनकवडीत ११ गणेश मंडळांची संयुक्त अनोखी मिरवणूक

पुणे : लोकनृत्य हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, जो कोणत्याही समाजाची विविध रूपे दाखवतो, यातून समाजातील परंपरा समजून घेता येतात. अशात धनकवडीतील ११ गणेश मंडळांच्या संयुक्त मिरवणुकीची चर्चा पुणे सहित संपूर्ण जगभर पोहचली आहे. ‘आदिवासी युनिव्हर्सल ट्रॅबल’ या संस्थेकडून शहरात प्रथमच गणेश आगमनाच्या वेळी आदिवासी संस्कृतीची झलक पहावयास मिळाली. यात आदिवासी नृत्य आणि संगीताला समर्पित करण्यात आली. यांच्या पारंपारिक नृत्य आणि संगीताने गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केले.

तत्पपूर्वी स्थानीक आमदार भीमराव तापकीर, विशाल तांबे, नगरसेविका वर्षाताई तापकीर, बाळासाहेब धनकवडे, अनिल भोसले, ११ गणेश मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे अध्यक्ष संतोष धनकवडे, अभिषेक तापकीर, उदय जगताप ,  ,विजय क्षीरसागर,प्रतिक कुंभार, रुपेश रणावरे, आनंद शिंदे आणि विश्वस्त अनिरुद्ध येवले यांच्या हस्ते गणेश पूजा करण्यात आली.

अधिक वाचा  सुनेची आत्महत्या : आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पती आणि मुलाला अटक

संयुक्त मिरवणुकीचा नवा पायंडा घालाणार्‍या एकत्रित सार्वजनिक मिरवणुकीत धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहन मित्र मंडळ यांच्या सारख्या ११ गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणुक काढली. आदिवासी सांस्कृतिक जतन रथात 11 गणेश मंडळाचे गणपती विराजमान झाले होते. ही मिरवणुक दुपारी १२.३० वा. गुलाबनगर, धनकवडी येथून काढण्यात आली. त्यानंतर धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहननगर येथे पोहचली. या मिरवणुकीत जवळपास १० हजार गणेश भक्त सहभागी झाले होते.

अधिक वाचा  पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश वस्तु आढळल्याने खळबळ

ज्ञानप्रबोधिनी वाद्य आणि गोविंदा बँड पथक यांच्या ढोल ताशांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. पालघर आणि गडचिरोली येथील आदिवासी नृत्यामध्ये शिकार कलेचे दर्शन घडविणार्‍या नृत्याने बाप्पाच्या आगमनाची सुरूवात झाली. वाघाची वेशभूषा परिधान केलेल्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याच क्रमात महिला व पुरूषांची नृत्य झाले. ज्याची लोकप्रियता सध्या संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कलाकारांनी या पारंपारिक नृत्यांना सांस्कृतिक चव जोडून मनमोहक बनवले. या मध्ये धार्मिक, आध्यात्मिक आणि पौराणिक कथा जिवंत केल्या.

मुख्यावट्याऐवजी, कलाकारांनी प्रत्येक पात्राला वेगळी ओळख देण्यासाठी चमकदार रंगांचा वापर केला, तर हात पायांची चपळता आणि चेहर्‍यावरील हावभाव गणेश भक्तांच्या टाळ्या मिळवत होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love