समाजसेवेसाठीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने जनकल्याण समिती सन्मानित

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा शौर्य पुरस्कार हुतात्मा कर्नल बी संतोष बाबू यांना मरणोत्तर तर समाजसेवेसाठी पुरस्कार रा.स्व.संघ  जनकल्याण समिती, पुणे महानगराला प्रदान करण्यात आला आहे. शुक्रवार,२८ मे २०२१ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीदिनी या दोन्ही पुरस्कारांचा ऑनलाईन वितरण समारंभ झाला.

स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार हा गलवान घाटीत चिनी हल्ल्याला चोख प्रतिउत्तर देताना हुतात्मा झालेले १६ बिहार रेजिमेंटचे कर्नल बी संतोष बाबू यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वीरपत्नी संतोषी संतोष बाबू यांनी स्वीकारला. १ लाख १ हजार १ रूपये, स्मृती चिन्ह आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा आणि मानपत्र असे पुरस्काराने स्वरूप आहे.

तर स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवेसाठीचा पुरस्कार रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या पुणे महानगराला प्रदान करण्यात आला. ५१ हजार रूपये, स्मृती चिन्ह  आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा आणि मानपत्र असा पुरस्काराचे स्वरूप आहे. जनकल्याण समितीच्या पुणे महानगराचे कार्यवाह अश्विनीकुमार उपाध्ये यांनी सन्मान स्वीकारला.

या कार्यक्रमात जनकल्याण समितीने कोवीड आपत्ती काळात केलेल्या कार्याची ध्वनी चित्रफीत दाखविण्यात आली. कोरोना संसर्ग काळात अतिशय महत्वाच्या आणि मोलाच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार जनकल्याण समिती, पुणे ला देण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जनकल्याण समितीचे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, प्रांत कार्यवाह श्री. तुकाराम नाईक व पुणे महानगर कार्यवाह श्री. अश्विनीकुमार उपाध्ये हे ऑनलाईन सहभागी झाले होते.

मागील ४८ वर्षातील जनकल्याण समितीतर्फे राबविण्यात आलेली सेवा कार्याची यादी पाहिली तरी आपत्ती निवारण कार्यात जनकल्याण समितीच्या समर्पित कामाचे महत्त्व लक्षात येते. मोर्वीचा पूर, आंध्रप्रदेशचे वादळ, १९९३ चा किल्लारीचा भूकंप, २०१८ चा सांगली -कोल्हापूर पूरपरिस्थिती व जुलै २०२० पासून ते आज तागायत वेगवेगळ्या आपत्ती कार्याची दाखल घेऊन वेगवेगळ्या आपत्ती निवारण कार्यात पुढाकार घेत आहेत. जनकल्याण समिती `समाजाकडून समाजाला` या तत्वाला अनुसरून काम करते आहे असे मनोगत श्री. उपाध्ये यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना कालावधीत जनकल्याण समितीने पुणे महानगरात राबविलेले उपक्रम

– ४२,०३२ – शिधा किटचे वितरण

– ७,६०,३६७ –  भोजन पाकीटांचे वितरण

– ३०८७ – नागरिकांचे रक्तदान

– २०,८०३ – मास्क, सॅनिटायझर, आयुर्वेदिक काढ्याचे वाटप

– १७०० – रुग्णांना कोवीड सेन्टरमध्ये उपचार.

– ५ – डॉक्टर्सची पूर्णवेळ सेवा.

– २५९ पुरुष व ८९ महिलांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग.

– ५०० स्वयंसेवकांनी व १०० डॉक्टर्सनी मिळून वस्ती व नागरी वस्तींमध्ये जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी

मदतकार्य

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा दुष्परिणाम वेगवेगळ्या पातळयांवर अद्यापही दिसतो आहे. रा.स्व.संघ जनकल्याण समितीकडून समर्थ भारत उपक्रमाच्या मदतीने वेळेची गरज लक्षात घेऊन मार्च २०२१ महिन्यापासून खालील स्वरूपातील मदतकार्य सुरू आहे. –

१. कोवीड हेल्पलाईन, २. कोरोना वॉररूम, ३. ऍम्ब्युलन्स सेवा, ४. रक्तदान शिबिरांचे आयोजन ५. प्लाझ्मा दाता संपर्क अभियान, ६. लसीकरण केंद्रांवर प्रशासनास डेटा पंचिंग व अन्य सेवेमध्ये सहभाग, ७. कोवीड रुग्ण व नातेवाईकांचे समुपदेशन, ८. कोवीड केअर सेंटर, ९. पोस्ट कोवीड ओपीडी १०. होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णांसाठी आरोग्य मित्र योजना, ११. शिधावाटप 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *