Jain boarding land sale controversy: मी विकृतीच्या विरोधात बोलतोय, पक्षावर नाही- रवींद्र धंगेकर

Jain boarding land sale controversy
Jain boarding land sale controversy

Jain boarding land sale controversy:पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (Sheth Hirachand Nemchand Jain Digambar Boarding) (जैन बोर्डिंग) जागेच्या रिडेव्हलपमेंटसाठी विश्वस्तांनी महापालिकेत अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे पुणे महानगर प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जैन बोर्डिंगसाठी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि त्या निधीतून तिथे एक चांगले मंदिर उभारावे अशी मागणीही त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. धंगेकर (Dhangekar) यांनी जैन दिगंबर बोर्डिंगच्या विक्रीव्यवहारासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. चौकशीच्या मागणीसोबतच, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे एक विशेष विनंती केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, जैन बोर्डिंगसाठी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि त्या निधीतून तिथे एक चांगले मंदिर उभारावे.

अधिक वाचा  पुण्यातील राजगुरूनगरमध्ये दोन मुलींची लैंगिक अत्याचार करून हत्या

‘मी विकृतीच्या विरोधात बोलतोय, पक्षावर नाही’

रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील विविध प्रश्नांवरून मंत्र्यांवर आरोप करत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेकडून त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना धंगेकर (Dhangekar) यांनी सांगितले की, “मी माझं बोलणं थांबवणार नाही,”. तसेच, त्यांनी कधीही भाजपा पक्षावर टीका केली नसल्याचे नमूद केले आहे. ते म्हणाले, “मी विकृतीच्या विरोधात बोलत आहे”. धंगेकर (Dhangekar) यांनी आपल्या संघर्षाला पुणेकरांची लढाई असे स्वरूप देत, आपण या विकृतीच्या विरोधात बोलत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी असाही दावा केला की मागच्या आठवड्यात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देखील त्यांची बाजू मांडली होती. पक्षनिष्ठेबद्दल बोलताना धंगेकर (Dhangekar) म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जे आदेश देतील, त्याचे मी पालन करेन. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आव्हान देत विचारले की, “भाजपाच्या एकाही कार्यकर्त्यांनं सांगावं की मी पक्षावर टीका केली आहे”.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love