आई.. कुस्ती जिंकली पण मी हरले.. माफ कर मला : भारताची कुस्तीगीर विनेश फोगाट हिचा कुस्तीला अलविदा

भारताची कुस्तीगीर विनेश फोगाट हिचा कुस्तीला अलविदा
भारताची कुस्तीगीर विनेश फोगाट हिचा कुस्तीला अलविदा

नवी दिल्ली: शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्याने पॅरिस ऑलिम्पिकच्या महिलांच्या 50 किलो गटात सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्याने निराश झालेली भारताची कुस्तीगीर विनेश फोगाट हिने जड अंत:करणाने कुस्तीला अलविदा केलं आहे. विनेशने  ही घोषणा  ‘एक्स’ वर पोस्ट करून केली आहे. दरम्यान, विनेशने अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने भारतीय नागरिक आणि तिच्या चाहत्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असून विनेश फोगाटने हिम्मत सोडू नये अशी आशा व्यक्त केली जात आहे.

विनेश फोगाट हिने एक्सवर  पोस्ट करीत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. विनेशने आपल्या एक्स पोस्टमध्ये… “आई, कुस्ती जिंकली पण मी हरले. माफ कर मला. तुझं स्वप्न… माझी हिंमत सर्व संपलंय. याहून अधिक ताकद राहिली नाही माझ्यात. अलविदा कुस्ती. कायम तुमची ऋणी राहीन.. माफ करा”…! असे म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  'दगडूशेठ' गणपतीची सिंह रथातून थाटात मिरवणूक : श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू (हुमनाबाद, कर्नाटक) यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना