आंतरिक ऊर्जा वाढवून जीवन संतुलित करा : मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स डॉ.प्रचिती पुंडे यांचे विचार

आंतरिक ऊर्जा वाढवून जीवन संतुलित करा
आंतरिक ऊर्जा वाढवून जीवन संतुलित करा

पुणे: “अनेक समस्यांपासून स्वतःला मुक्ती मिळवायची असेल तर शरीराव्यतिरिक्त स्वतःला आजच्या आधुनिक जगात ग्लॅमोवेल पद्धतीमध्ये सहज आणि कमी वेळात वर्क लाइफ बॅलन्स करायल शिका. चिंतन करून स्वतःचे गुण लक्षात घेऊन क्षणिक आवेग, आकांक्षा आणि नकारात्मक विचारांच्या प्रवाहांना नियंत्रित करून योग्य दिशा दिली जाऊ शकते. त्यातुनच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उपलब्ध होते.”असे विचार प्रोलक्स प्रोडक्शनच्या संस्थापक संचालिका आणि मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स डॉ.प्रचिती पुंडे यांनी व्यक्त केले.

प्रोलक्स ग्लॅमोवेलच्या वतिने ‘प्रोलक्स गाला: द ग्लॅमोवेल एक्स्ट्रावेगांझा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे शहरात ८ ते ११ ऑगस्ट या काळात विविध ठिकाणी रॅली काढण्यात आली.

आपल्या व्यस्त जीवनात ग्लॅमर आणि आरोग्य यांच्यातील समतोल राखण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे मुख्य उद्देश्य ठेऊन या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली प्रोलेक्स आणि ग्लॅमोवेलचे बाणेर येथील मुख्यालयातून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ४ दिवस काढण्यात आली. डॉ.प्रचिती पुंडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीत शेकडो नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग दर्शविला.

अधिक वाचा  'टिकटॉक स्टार' समीर गायकवाडने का केली आत्महत्या?

एनसीसी हेड क्वॉटर, टाईम्स अ‍ॅण्ड ट्रेड आणि डेक्कन येथील श्री महावीर जैन विद्यालय येथील विद्यार्थी, कर्मचारी व उपस्थित नागरिकांना डॉ.प्रचिती पुंडे यांनी ३ ते ३० सेकंदापेक्षा कमी वेळेत जीवन सहजरित्या कसे करावे या संदर्भात छोट्या छोट्या टीप्स दिल्या.

आयोजित कार्यक्रम रश्मी मॅडम, कमांडर अल्पेश मोहन, ट्रेनर व डिपार्टमेंटल एचओडी राजेश सिंग, तरावडे आणि यशराज यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.

डॉ.प्रचिती पुंडे म्हणाल्या, ” आपण आपली आंतरिक ऊर्जा दिवसभर वापरतो. पण ती साठवत नाही, ज्यामुळे जीवन असंतुलित होते. हे संचित करून मनुष्य आपल्या जीवनाचा समतोल साधू शकतो. आजची पिढी मोबाइल व बाह्य जगात स्वतःला विसरली आहे. त्यामुळे ग्लॅमोवेल मुळे स्वयं प्रेरणेची गरज आहे. त्याचप्रमाणे एनसीसीचे विद्यार्थ्यांना होणार्‍या मसल पेन कमी करण्यासाठी आंतरिक मन ढासळू देऊ नये यासाठी मनावर सरळ सरळ ताबा कसा मिळवावा या संदर्भात अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट व ग्लॉमोवेलच्या टिप्स दिल्यात.”

अधिक वाचा  बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेचा पुण्यात अपघात

“आनंदी जीवनासाठी प्रत्येकाशी हसतमुख बोलावे. कामाच्या ठिकाणी इंटरपर्सनल रिलेशन मॅनेज कसे करावे यावर विस्तृत माहिती डॉ. पुंडे यांनी दिली. विद्यार्थीदशेत मुले सतत मोबाइलच्या आहारी जातात. त्यांच्या समोर सक्सेस, नोकरी, शारीरिक व्यायामाचा अभाव, प्रत्येक गोष्टीची काळजी करणे या सर्वांपासून सुटकेसाठी डॉ. पुंडे यांनी ऊर्जा जागृतीच्या टिप्स दिल्या. तसेच आपले प्रश्न आपण कसे सोडवायचे या संदर्भातील व्यायाम शिकविण्यात आले. ग्लॅमोव्हेलच्या लक्झरी आणि आरोग्याचे परिपूर्ण सुसंगत मिश्रण करण्याच्या क्रांतिकारक संकल्पनेला त्यांनी सर्वांच्या समोर मांडले.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love