मी गाऱ्हानी मांडण्याइतका लेचापेचा आणि आंडूपांडू नाही -सुरेश धस


पुणे(प्रतिनिधी)- भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर सर्वांना माहिती आहे. आज पुन्हा त्याची प्रचीती आली. राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक झाली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. या बैठकीला भाजपचे आमदार सुरेश धस यांना बोलाविण्यात आले होते. परंतु, बैठकीच्य काहीवेळ अगोदर त्यांना या बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचा निरोप मिळाला. त्यामुळे संतापलेल्या धस यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या समोर धरणे धरल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना फोन करून बैठकीला बोलावून घेतले. मात्र, धनंजय मुंडे यांच्यामुळे आपल्याला बैठकीला येऊ दिले जात नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी बैठकीपूर्वी केला होता.

अधिक वाचा  शाळांच्या मनमानी शुल्क आकारणीस सरकारचा छुपा पाठिंबा- माधव भंडारी

 बैठक संपवून बाहेर आल्यानंतर तुम्ही बैठकीला उपस्थित राहू न दिल्याबद्दल काही चर्चा झाली का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर, पुन्हा एकदा त्यांनी ‘मी अशी गाऱ्हानी मांडण्याइतका लेचापेचा आणि आंडूपांडू नाही’ असे सांगत धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

दरम्यान, बैठकीमध्ये उसतोड कामगारांच्या प्रश्नांदर्भात सकारात्मक चर्चा झाली. आजपर्यंत या संदर्भातील बैठकीसाठी शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांनी नेहेमी मला बोलावून घेतले, उसतोड कामगारांच्या वेतनात ८५ टक्के वाढ करावी अशी मागणी आपण केली आहे असे सांगत दोन महिने संप मागे घेत असून दोन महिन्यानंतर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा उसाच्या फडत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love