बेकायदेशीर साठा केलेल्या सिलेंडर पैकी १० सिलेंडरचा भीषण स्फोट

10 cylinder detonation
10 cylinder detonation

10 cylinder detonation: पुण्यातील(पुणे) विमाननगर(Viman nagar), सिम्बायोसिस (Symbiosis) कॉलेजजवळ, रोहन मिथिला इमारतीलगत एका खोलीत जवळपास १०० सिलेंडरचा(Cylinders) अवैधरित्या  साठा (Illegall stock) करण्यात आला होता. बुधवारी दुपारी बेकायदेशीर साठा केलेल्या सिलेंडर पैकी १० सिलेंडरचा भीषण स्फोट (Cylinder Sfot) होऊन आग लागली. (Illegally stocked 10 cylinders explode)

याबाबतची माहिती मिळताच, अग्निशमन दलाकडून (Fire Briged) तीन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली गेली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच, विमानतळ पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती पाहणी केली.

अधिक वाचा  अरुण पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण, आयुष्यमान भारत, सुकन्या योजना आदी उपक्रमांनी उत्साहात साजरा 

अग्निशामक दलाचे अधिकारी सोपान पवार (Sopan Pawar) यांनी सांगितले की ,सदर आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षास दुपारी दोन वाजून 52 मिनिटांनी विमानतळ परिसरातील हरिझन डेव्हलपर्स या ठिकाणी न्यूवॉन साईटच्या मागे लेबर कॅम्प शेजारी कमर्शियल आणि घरगुती सिलेंडरला आग लागण्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्यानंतर तातडीने आग आटोक्यात आणली गेली आहे .सुदैवाने शंभर पैकी दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याने स्फोटाची भीषणता वाढली नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love