gtag('js', new Date());
पुणे- पुण्यामध्ये शनिवारी दिवसभरात ८२७  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात ८०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यान, १६ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू  झाल्याने पुण्यातील कोरोनाबाधित एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ८१६ झाली आहे.सध्या, ४६१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ६४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २६९०४...
पुणे(प्रतिनिधी)—पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. खासदार गिरीश बापट यांनी गिरीश बापट यांनी पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केल्याचा आरोप केला. तसेच असे निर्णय होत राहिले तर आम्ही यापुढे काय करायचं हे ठरवू, असा इशारा अजित पवार यांना दिला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला...
पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पुण्यातील पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच शनिवारी पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.कोरोना साखळी तुटत नसल्याने पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयावरून आरोपांच्या फैरी सुरू असतानाच आता मनपा आयुक्तांची सुट्टी करण्यात आली आहे. पुणे मनपा...
हिंगोली—कोरोनाच्या संकटाचा यंदा १२वी आणि १० वी परीक्षांच्या निकालाही विलंब झाला आहे. मात्र, बहुप्रतीक्षेत असलेला निकाल लवकरच लागणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. बारावीचा निकाल १५ ते २० जुलै या कालावधीत तर दहावीचा निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे, त्यांनी स्पष्ट केले.
काय बंद राहणार?काय सुरु राहणार?पुणे--पुणे आणि पिंपरी-शहरात दि. १३ जुलै ते २३ जुलै असा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही घोषणा पत्रकार परिषदेत केली. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा या काळात सुरु राहणार आहेत.
पुणे—कोरोनाच्या संकटाने नैराश्या आल्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत असतानाच पुणे जिल्ह्यातील मोशी येथे एका २४ वर्षीय अभियंत्याने एका इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अक्षय पोतदार (वय २४, रा. चिखली, साने चौक. मूळ गाव – वाई, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.त्याने...