gtag('js', new Date());
परभणी: राज्यात शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून राज्य सरकार आणि युजीसीमध्ये वाद सुरु आहे. अशातच आता राज्यातील अकोला कृषी विद्यापीठा अंतर्गत अमरावती कृषी विद्यालयामधील २४७ विद्यार्थ्यांना कोविड-19 असा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका देण्यात आल्याने  नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे स्पष्ट केल आहे. राज्य शासनाचे असे कोणतेही...
जयपूर (ऑनलाईन टीम)-कॉंग्रेसने सचिन पायलट आणि राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारविरुध्द बंड पुकारलेले अन्य दोन मंत्री यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष पदावरून  हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यावर सचिन पायलट यांनी “सत्याला तुम्ही व्यथित करु शकता, पराभूत करु शकत नाही” (सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं) असे ट्वीट...
जयपूर(ऑनलाईन टीम)— राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा शेवट अखेर पक्षात फुट पडण्यामध्ये झाला. मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.  त्यांच्या जागी गोविंदसिंग डोटासरा  यांची नवे प्रदेशाध्यक्षपद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय पायलट...
ऑनलाईन टीम—एलजी या प्रख्यात कंपनीने अमेरिकेमध्ये आपला LG Aristo 5 हा आकर्षक स्मार्टफोन  लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3,000 एमएएच बॅटरी, एचडी डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये युजर्सना दोन कॅमेरे मिळाले आहेत. दरम्यान, एलजी कंपनीने अद्याप  LG Aristo 5 भारतासह इतर देशांमध्ये लॉन्च करण्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
वॉशिंग्टन(एएनआय)—गल्वान खोऱ्यात चीन आणि भारताच्या सैनिकांच्या धुमश्चक्रीत मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांच्या बलिदानाकडे चीन दुर्लक्ष करत असल्याचे वृत्त आहे.  अमेरिकेच्या इंटेलिजन्स असेसमेंट रिपोर्टनुसार चीन आपल्या सैन्याने केलेल्या त्यागाला मान्यता देण्यास तयार नाही. त्यात म्हटले आहे की चीन सरकार संघर्षात ठार झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांवर मृत सैनिकांच्या अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कारांचे आयोजन न करण्यासाठी दबाव आणत आहे.
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुगलने ‘गुगल फॉर इंडिया २०२०’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. गूगल फॉर इंडियाची ही सहावी आवृत्ती होती. हा कार्यक्रम प्रथमच वर्चुअली आयोजित करण्यात आला होता. गूगल फॉर इंडिया कार्यक्रमाची सुरुवात गुगल इंडियाचे प्रमुख संजय गुप्ता यांनी केली. ते म्हणाले की गुगल भारतात इतके स्मार्ट झाले आहे की २४ तास अगोदर हवामानाचा अचूक...