gtag('js', new Date());
पंढरपूर- बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, “नितीनजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात असे म्हणत बेळगावात कोणत्याही पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नये असे आवाहन केले होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
बेळगाव- बेळगाव लोकसभा पोडनिवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यांनी काल शेळके यांच्यासाठी प्रचार सभा घेऊन कर्नाटक सरकार आणि सीमाभागात मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कन्नडिगांना इशारा देताना  ‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, अशी तोफ डागली होती. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी...
पुणे-- जमीन विकत घेऊन उरलेली रक्कम तर सोडाच परंतु आपली उरलेली रक्कम मागण्यासाठी गेलेल्या जमीन मालकाला गोळ्या घालण्याची धमकी देवून 20 रुपयांची खंडणी मागणाऱ्या पांच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये पुण्याच्या बुधवार पेठ भागातील बडा सराफी व्यावसायिक गौतम जयंतीलाल सोळंकी आणि रणधीर जयंतीलाल सोळंकी यांचा समावेश...
पुणे- –पुण्यातील व्यापारी महासंघाने आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीला विरोध दर्शवला असून या संचारबंदीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्यावरचे स्टॉल सुरू राहणार, रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू राहणार, मग हा कसला लॉकडाऊन, असे म्हणत पुणे व्यापारी महासंघाने आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.पुण्यातील व्यापाऱ्यांनी...
पुणे : राज्य सरकारच्या निर्णयानुसार  संचारबंदी लागू झाली असुन, पुणे महापालिकेच्या पुर्वीच्या निर्णयानुसार शहरात शनिवार आणि रविवार हे सलग दोन दिवस १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी आदेश जारी केले आहे.मंगळवारी राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत....
पुणे- मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूकवरून जनतेला संबोधित करताना राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली. या काळात राज्यात 144 कलम लागू राहतील हे सांगतानाच अनेक गोष्टी सुरू राहण्याबाबतही त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या घोषणांवरुन  नेहेमीप्रमाणे सोशल मिडियावर संचारबंदीबाबत संदिग्धता असल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर मुख्यमंत्र्यांना ट्रोल केले जात आहे.