gtag('js', new Date());
पुणे -राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२ वी आणि माध्यामिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात १० वी च्या लेखी परीक्षांचे याअगोदर जाहीर केलेले संभाव्य वेळापत्रक मंडळाने कायम केले असून त्याप्रमाणे या परीक्षा  एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक म्हणजे १२ वीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे...
पुणे –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी (दि.२६)  मुलांच्या वसतिगृहाजवळ 'किंग कोब्रा' आढळल्याने खळबळ उडाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या वसतीगृहामध्ये विद्यार्थी नाहीत. दरम्यान,  विद्यापीठाचे सुरक्षारक्षक सुनील यांनी या किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडले.शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुलांचे वसतिगृह क्रमांक ९ येथील केबिनमध्ये नाग आढळल्याचे वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच...
पुणे- राज्यभर गाजत असलेल्या पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्यानंतर याप्रकरणात 18 दिवस उलटूनही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने आता थेट न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. यामध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून न्यायालयाने युक्तिवाद ऐकून आदेशासाठी 5 मार्च तारीख दिली आहे.लीगल जस्टीस सोसायटी...
पुणे- प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेलं वाहन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून उद्योगपति अंबानी आणि अदानी हे आंदोलक शेतकरी आणि विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय रंग प्राप्त झाला असून स्वाभिमानी शेतकरी...
पुणे—सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवले पाहिजे यश माझी स्पष्ट भूमिका आहे. हा फुले, शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे इथे स्रीयांचा सन्मान झालाच पाहिजे असे सांगत खरोखरच संजय राठोड चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.पुण्यामध्ये...
पुणे- मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिल्या जाणार्‍या ‘मराठी रत्न’ पुरस्कारासाठी यंदा ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे, साप्ताहिक सकाळच्या माजी कार्यकारी संपादक व ‘प्रथम बुक्स’च्या वरिष्ठ संपादक संध्या टांकसाळे व ‘अक्षरधारा’ बुक गॅलरीच्या सौ. रसिका आणि रमेश राठिवडेकर यांची निवड करण्यात आली आहे.पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ...