gtag('js', new Date());
पुणे-- पुणे शहरातील कोरोनच्या दररोज नवीन वाढत्या रुग्ण संख्येने पुणेकरांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दररोज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजरांपेक्षा जास्तने वाढत आहे. शुक्रवारी  पुणे शहरात तब्बल 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 28 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या 28 मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 13 रुग्ण...
पुणे- समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडनचे संचालक महेश मोतेवार यांनी शेतकरी आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून दगडूशेठ’ हलवाई गणपतीला दान केलेला दीड किलो सोन्याचा हार गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) जप्त केला आहे.   समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या आमिषाने देशभरातील गुंतवणुकदारांना...
पुणे –पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. बंधने पाळण्यासाठी आवाहन करूनही नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी व्हायला तयार नाही. शहरातील नवीन कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसाला दोन हजारापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे पुणे महापालिका खडबडून जागी झाली असून आता शहरातील निर्बंध अधिक वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे...
पुणे- बँकेतील डोरमंट (निष्क्रिय खाते) खात्यांचा गोपनीय डाटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक महिलेसह अटक केलेल्या आठ जणांमध्ये अभिनेते रवींद्र मंकणी यांचे पुत्र व भाजपचे चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष रोहण मंकणी यांचा समावेश आहे. न्यायालयाने या सर्वांना 20 मार्च पर्यन्त पोलिस कोठडी दिली आहे. या सर्वांकडून...
पुणे-शिक्षणाला गुणवत्तापूर्ण आणि जीवनोपयोगी बनवणे, हे आजही आपल्या धोरणात अग्रस्थानी आहे. पुढची पिढी आत्मनिर्भर भारतासाठी आणि नवनिर्माणासाठी सज्ज होण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० होय. देशात किमान शिक्षणाचा टक्का वाढत असला तरीपण, गुणवत्तेच्याबाबतीत काही प्रमाणात प्रश्नचिन्ह आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणातील गुणवत्ता सुधारणेवर भर देण्यात आल्याचे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे...
पुणे- पुण्याच्या  उपमहापौर बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पुण्याच्या उपमहापौर आरपीआयच्या सरस्वती शेंडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी रात्री पक्षाकडे सुपूर्द केला आहे. पक्षातील वरिष्ठांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. दरम्यान, शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार आणि भाजप पुन्हा आरपीआयला संधी देणार का? याबाबत चर्चा सुरु झाली...