पुणे-- राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात येणार असल्याचे सुतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले असले तरी पुण्यात शनिवार आणि रविवारी काहीशी शिथिलता देऊन अत्यावश्यक सेवेतील दुकाने नियोजित वेळेत सुरु ठेवण्यात येतील, अशी माहितीही टोपे यांनी दिली आहे. .त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर केली जाणार असून शिथिलतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असणार आहेत, अशी माहिती टोपे यांनी...
राजकारण
#मराठा आरक्षण: संभाजीराजे छत्रपती यांच्या 6 जून पर्यन्तच्या अल्टिमेटमवर दिली ही प्रतिक्रिया
News24Pune -
पुणे-मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सांभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभर दौरा करून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारला पर्याय देत 6 जून पर्यन्त अल्टिमेटम दिला आहे. "६ जून रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले. आज मी घोषणा करतोय. ६ जूनपर्यंत आमच्या पाच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ६ जूनपासून रायगडावरुन...
पुणे—कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही आषाढी वारी होण्याची शक्यता नसल्याचे संगितले जात आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असली तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता बघता राज्य शासन वारीला परवानगी देईल असे वाटत आहे. मात्र, वारकऱ्यांनी यंदा 500 लोकांनी वारी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, आज पालखी सोहळ्याचे मान्यवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...
राजकारण
चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? – जयंत पाटील टोला
News24Pune -
पुणे-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वप्ने पाहण्याचा छंद जडला आहे. त्यातूनच ते वेगवेगळी वक्तव्य करीत असतात. मात्र, महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे. चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? असा खोचक टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत...
पुणे- राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट अजूनही जास्त आहे त्या ठिकाणी आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे सुतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे त्याठिकाणी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाऊ शकते मात्र, संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही असे टोपे यांनी स्पष्ट केल्याने...
पुणे-पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सिद्धार्ध बनसोडेसह 4 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत आतापर्यंत सिद्धार्थ बनसोडे याच्यासह 13...














