राजकारण
डॉ.आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावरून जात असलेल्या देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न काही संकुचित वृत्ती करतात – देवेंद्र फडणवीस
News24Pune -0
पुणे-- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीत दिलेलं जे भाषण आहे ते आजही द्यावं अशी आज परिस्थिती आहे. संकुचित वृत्ती सोडून आपण एका मार्गानं चालण्याचा विचार केला तर आपण हा देश महान बनवू शकतो. आज देश त्या मार्गानं चाललेला आहे. मात्र, काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरुन देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र...
राजकारण
मिलिंद नार्वेकरांचे मातोश्रीशी भांडण झाले की काय? का म्हणाले चंद्रकांत पाटील असे?
News24Pune -
पुणे - मिलिंद नार्वेकरांचे मातोश्रीशी भांडण झाले की काय कळत नाही. त्यांनी असे ट्विट करणे हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.बाबरी मशीद विध्वंसाला आज २९ वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी केलेले एक ट्विट सध्या चर्चेचा विषय...
पुणे – पुण्यातील कात्रज परीसरात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज (सोमवार) घडली. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर घडली.समीर मनूर शेख (वय 28, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे...
पुणे-मुंबई
‘पिफ’ मधील समंजस प्रेक्षक चित्रपटाला देत असलेला प्रतिसाद पाहून आत्मविश्वास वाढला
News24Pune -
पुणे -चित्रपट आवडला नाही, कंटाळवाणा वाटला तर चित्रपटगृहातील प्रेक्षक मोबाईल पाहत बसतात, बाहेर चक्कर मारून येतात, चुळबळ करतात. प्रत्येक चित्रपटाच्या संवेदना वेगवेगळ्या असतात. या संवेदना जपणारा, समंजस प्रेक्षक पुण्यात आहे. यामुळेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढला. इतकेच नाही तर आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना या महोत्सवात कौतुकाची थाप मिळाली, असे...
पुणे: देशातील अग्रगण्य आभूषण विक्रेत्या साखळी दालनांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे नवीन दालनाचे फिनोलेक्स चौक, पिंपरी येथे नुकतेच उद्घाटन झाले. पारंपारिक आणि समकालीन अभिरुचीनुसार आणि जागतिक दर्जाच्या खरेदीचा अनुभवाच्या अभिवचनासह विस्तृत श्रेणीचा संग्रह असलेले, ही नवीन शोरूम महाराष्ट्रात ब्रँडच्या झपाट्याने विस्तारणाऱ्या उपस्थितीला अधिक चालना देणारे असल्याचा दावा मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या वतीने करण्यात आला...
गेल्या काही वर्षात बदललेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. LAC वर चीन बरोबर तणावग्रस्त परिस्तिथी,अमेरिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न, चीनलगतच्या सीमेवर साधनसंपत्तीचा विकास, ‘अॅक्ट ईस्ट’ पॉलिसी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्यत्त्व मिळवण्यासाठीचे प्रयत्न या सर्वांमुळे भारतामध्ये परराष्ट्र धोरणाला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. परंतु सध्याच्या अनेक धोरणांबाबतचे विचार 1950 च्या दशकामध्येच डॉ. बाबासाहेब...














