gtag('js', new Date());
एमआरपी व्यवस्थेतील अपारदर्शकतेविरोधात पुण्यात आंदोलन
पुणे(प्रतिनिधी)--एमआरपी व्यवस्थेतील अपारदर्शकता व ग्राहकांच्या आर्थिक शोषणाविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवारी सविनय सत्याग्रह आंदोलन व निदर्शने करण्यात आली.आंदोलनाचे नेतृत्व मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब सीताराम औटी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक, केंद्रीय कार्यकारी सदस्य विजय सागर, ज्ञानेश्वर उंडे यांनी केले. विधी आयाम प्रमुख श्रीकांत जोशी, जिल्हा सचिव अशोक भोर, जगन्नाथ खोकराळे, देवीदास काळे...
थिएटर कमांड्स भारतासाठी काळाची गरज
पुणे(प्रतिनिधी)--लष्करातील 'थिएटर रायझेशन' किंवा 'थिएटर कमांड्स' ही काळाची गरज आहे. हे मान्य करण्यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, हे मॉडेल राबवताना केवळ जगाचे अनुकरण न करता भारताच्या भौगोलिक आणि सुरक्षा आव्हानांचा विचार करून एक 'टेलर मेड' आणि कस्टमाईज्ड मॉडेल तयार करणे आवश्यक आहे, असे मत माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी) यांनी सोमवारी व्यक्त...
महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर; ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींची पुन्हा एकदा बाजी
पुणे(प्रतिनिधी)--महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने  फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल  शनिवारी (२ मे २०२६) घोषित करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या (९१.८८%) तुलनेत निकालात २.०९ टक्क्यांची घट झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण...
राज ठाकरे पुणे वरुणराज भिडे पुरस्कार भाषण
पुणे: "आजच्या काळात राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे. 'तुमच्या लिहिण्याने आमची सत्ता जात नाही आणि येतही नाही' असा जो अहंकारी समज राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे, तो मोडीत काढण्याची ताकद केवळ पत्रकारांच्या एकजुटीत आहे," अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर आसूड ओढले. पुण्यातील वरुणराज भिडे पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे...
राज ठाकरे वरुणराज भिडे पुरस्कार पुणे
पुणे(प्रतिनिधी)— स्वतःच्या राज्यात सुधारणा न करणाऱ्या 'भैय्यांना' इथे मराठी शिकवून काय साध्य होणार?, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उपस्थित केला. जिथे जमीन भुसभुशीत असते, तिथेच घुशी शिरतात," अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रातील मवाळ धोरणावर टीका केली.पुण्यातील वरुणराज भिडे पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाच्या वतीने देण्यात येणारा ‘पत्रकार वरुणराज भिडे...
Pune Insurance Policy Loan Fraud
पुणे : विमा पॉलिसी गहाण ठेवून शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे खोटे आमिष दाखवून विमा एजंटने लाखो रुपये प्रीमियमच्या विमा पॉलिसीज गळ्यात मारल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. इतरांची फसवणूक होऊ नये यासाठी या प्रकाराला बळी पडलेले अमित जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन फसवणूक करणाऱ्या विमा एजंटची कार्यपद्धती उघड करून दाखवली आहे. विमा कंपन्यांनी अशा एजंट वर नियंत्रण ठेवावे आणि...